अस्पृश्यांचे धर्मातर आणि त्यांचे राजकीय हक्क - Page 253

अस्पृश्यांचे धर्मांतर आणि त्यांचे राजकीय हक्कं २११-

विचारसरणी लबाडीची होती असे जरी स्पष्ट भाषेत म्हटले नाही तरी ती विचारसरणी अयोग्य आहे असा निकाल दिला. हॅमंड कमिटीसमोर अशाप्रकारे त्यांच्या करामतीची वासलात लागल्यानंतर आता हिंदू लोकांनी अस्पृश्यांचे राजकीय हक्क संपुष्टात आणण्याची ही दुसरी करामत चालू केली आहे.

हिंदू लोकांनी अस्पृश्यांच्या धर्मांतराच्या बाबतीत ज्या करामती चालविल्या आहेत त्या पाहता मालकांची गुलामासंबंधाने जी मनोवृत्ती दिसून येते तीच मनोवृत्ती हिंदू लोकांची अस्पृश्य वर्गासंबंधी दिसून येते. जर हिंदूंना अस्पृश्य वर्गाच्या कल्याणाची खरीखुरी कळकळ असती तर त्यांनी असे म्हटलें असते, ' खेद वाटंतो'

आजवर आम्ही तुम्हाला गुलाम म्हणून वागविले. आमच्या हातून तुमची उन्नती

होऊ शकली नाही. परंतु, आज आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य देतो, आणि तुमच्या उद्धाराची आमच्या मनाला जी तळमळ लागलेली आहे आणि तुमच्याविषयी आमच्या मनात ज्या सदिच्छा वसत आहेत त्यांची खूण पटविण्यासाठी आम्ही राजकीय सत्तेचा एवढा भाग तुमच्या स्वाधीन करतो. आपल्या इच्छित मार्गाने जा आणि आपल्या सामर्थ्याने समाजात योग्य असे सन्मानाचे स्थान प्राप्त करून घ्या. परंतु हिंदूंची मनोवृत्ती अशाप्रकारची नाही. गुलाम सेवा करण्याला कबूल असेल तरच त्याला अन्न घालणाऱ्या मालकाच्या मनोवृत्तीप्रमाणे हिंदू लोकांची मनोवृत्ती आहे. अस्पृश्य वर्गातील ज्या आमच्या मित्रांना हिंदू लोकांच्या. सहानुभूतीचा मोह वाटतो त्यांनी या त्यांच्या मित्रांच्या-हिंदूच्या-मनोवृत्तीपासून योग्य तो धडा घ्यावा. हिंदू लोकांना आमचे -उत्तर अगदी सरळ आणि सोपे आहे. आम्ही जे राजकीय हक्क संपादन केले आहेत ते हिंदू लोकांनी आम्हाला देणगी म्हणून दिलेले नाहीत. आमच्या.राजकीय हक्कांवर आमचा जन्मसिद्ध इक्क आहे. खिश्चन, मुसलमान किंवा शीख यांचा राजकीय हक्कांवर जितका . नैसर्गिक हक्क आहे त्यापेक्षा अस्पृश्यवर्गाचा अधिक हक्क आहे. आमचे नैसर्गिक हक्क आम्हाला या पूर्वीच मिळाले नाहीत, यावरून त्यांच्यावर आमचा हक्क. पोहोचत नाही असा अर्थ करता येणार नाही. आजपर्यंत हिंदू लोक सामर्थ्यवान होते आणि अस्पृश्य असमर्थ होते म्हणून हिंदू लोकांनी अन्यायाने दाबूंन ठेवलेले आमचे हक्क आम्हाला मिळू शकले नाहीत, एवढेच फार तर म्हणता येईल. आम्ही कोणत्याही तर्‍हेने हिंदूंचे ओशाळे नाही आणि जे हक्क वस्तुतः आमचेच होते ते आम्हाला मिळाल्याबद्दल हिंदू लोकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचे अस्पृश्यांना काहीच कारण नाही. उलट अस्पृश्यांचे मार्गात हिंदू लोकांनी जे काटे पेरले त्याबद्दल संताप वाटण्याला अस्पृश्यांना सबळ कारणे आहेत. अस्पृश्य वर्गाने जर कोणाबद्दल कृतज्ञता व्यक्त करावयाची असेल तर ब्रिटीश सरकार संबंधानेच होय! आमच्या संकटाच्या वेळी तेच आमच्या