महाराज-उत्कृष्ट न्यायाधीश - Page 258

७९
महाराज-उत्कृष्ट न्यायाधीश

सावंतवाडीचे लोकप्रिय राजेसाहेब श्रीमंत बापूसाहेब महाराज यांच्या अकाली मृत्यूची शोकजनक बातमी वाचल्यावर मला धक्काच बसला. राजेसाहेबांचे निधन ज्या परिस्थितींत झालें त्या दुर्दैवी परिस्थितीचे वर्णन शब्दांनी करतां

येणार नाही !

महाराजांच्या सहवासाचा दीर्घ कालपर्यंत लाभ घेण्याचे भाग्य माझ्या वांट्याला आले नाही. गरिबांचा कैवाळू आणि एक कर्तव्यनिष्ठ व प्रागतिक विचांरांचा संस्थानिक हा त्यांचा लौकिकच माझ्या परिचयाचा होता. महाराजांचा प्रत्यक्ष परिचय करून त्यांच्याशी संबंध येण्याची संधि फक्त एकदांच मला मिळाली. तथापि या अल्प परिचयांतच महाराजांच्या अंगच्या कांही ढळक सद्गुणांची जी छाप माझ्या मनावर पडली, ती कधींही पुसून जाण्यायोगी नाही. सावंतवाडी संस्थानांतील पडदें गांवचे जमीनदार श्री. वराडकर यांच्या खुनाच्या खटल्यांत आरोपींचा वकील या नात्यानें महाराजांपुढें अपील चालविण्यासाठी मी गेलो होतो. तेवढाच माझा व त्यांचा संबंध आला होता. पण अपीलाचें काम महाराजांपुढे सतत तीन दिवस चालू होते आणि महाराज दुपारी ११ वाजल्यापासून सायंकाळी ५-३० वाजेपर्यंत अपीलांतील मुद्ये लक्षपूर्वक ऐकत बसत. मध्यंतरी जी अर्ध्या तासाची सुट्टी ते घेत असत, तेवढीच त्यांची विश्रांती. मोठमोठ्या नाणावलेल्या न्यायमूर्तींच्या अंगीही क्वचितच दिसेल अशा सावधान वृत्तीने एका महाराजानें रोज सतत ६ तासपर्यंत वकिलांचा युक्तिवाद ऐकत बसावें, आणि मधून मधून एखाद दुसरा मार्मिक व मुद्येसुद प्रश्‍न विचारून आपली शंकानिवृत्ति करून घेण्याची कळकळ दाखवावी हा अनुभव मला निःसंशय असामान्य असाच वाटला. अपीलाचें काम चालू असतां नुसती उभयपक्षांच्या वकिलांची भाषणें

ऐकतच हे स्वस्थ राहिले नव्हतें; तर आपल्या सूक्ष्म व चिकित्सक दृष्टीला जेथें

जेथें शंकास्थळें दिसतील, तेथे तेथें या शंकांचा खुलासा विचारून वकिलांकडून आपले पूर्ण समाधान त्यांनी करून घेतलें, आणि त्यांनी काढलेल्या त्या शंका व घेतलेले आक्षेप बुद्धिमत्तासूचक होते.

महाराजांनी नंतर आपले जजमेंट तयार केलें आणि या जजमेंटवरूनही त्यांच्या श्रेष्ठ बुद्धिमत्तेची खात्री मला पटली. हे जजमेंट अव्वल दर्जाचे होते व सर्व मुद्यांचा विचार त्यांत अत्यंत खुलासेवार रीतीनें करण्यांत आला होता. महाराज