महाराज-उत्कृष्ट न्यायाधीश - Page 259

महाराज-उत्कृष्ट न्यायाधीश २१७

जरी स्वत: कायद्याचे पढीक पंडित नसले, तरी कायद्यांच्या मुद्यांवरची त्यांची पकड नांवाजण्याजोगी होती व योग्य निर्णय ठरविण्याची वृत्ति त्यांच्या अंगी उपजतच होती हैं या जजमेंटवरून माझ्या प्रत्ययास आले.

तथापि यापेक्षांही जर कोणत्या गोष्टींचे मला त्यावेळी अधिक नवल व कौतुक वाटलें असेल, तर ते महाराजांच्या धर्मशीलतेचें | कामाला सुरवात करतांना ते नेहमीं दोन्ही हात जोडून व डोळे बंद करून परमेशवराचें नामस्मरण करीत व तोंडानें कांही तरी पुटपुटत असत. आपल्या कर्तव्याची जाणीव सदैव चित्तांत बाळगून हें कर्तव्य उत्कृष्ट रितीनें पार पाडतां यावें म्हणून परमेश्वराची भाविकपणें करूणा भाकणारा असा पापभीरू न्यायप्रिय नृपति नृपमंडळांत एखादा तरी आढळून येईल काय ? अशा प्रकारच्या या थोर, कर्तव्यतत्पर व वंदनीय पुरुषांचे जीवितकार्य आकस्मिक रीतीनें मध्येंच कुंठित व्हावे हे, खरोखरच दुर्दैव म्हटलें पाहिजे. या दुर्दैवानें भारावून गेलेल्या राजकुटुंबाबद्दल मला अत्यंत सहानुभुति वाटते, व महाराजांच्या प्रजेला त्यांच्याबद्दल अभिमान, आदर व प्रेम वाटत असें हें मला माहित आहे. ही प्रजाही आपल्या खऱ्या हितकर्त्याला मुकल्याबद्दल मला खेद होतो. परमेश्वर बापूसाहेबांच्या आत्म्याला चिरशांति देवो |

विविध वृत्त : ता. ११ जुलै १९३७