रॅम्से मॅक्डोनल्ड व हिंदुस्थान - Page 260

८०

रॅम्से मँक्डोनल्ड व हिंदुस्थान

“मॅक्डोनल्ड आपण फिरून आपल्या पक्षाला जाऊन कां मिळत नाही ?” - एक वर्ष झाले; गेल्या नोव्हेंबरांत लंडनमध्ये माझा मुक्काम असतां मी रॅम्से मँक्डोनल्ड यांच्या भेटीस गेलो असतां त्यांना मी वरील प्रश्‍न केला होता. माझा प्रश्‍न ऐकून क्षणभर विचार करीत त्यांनी खिन्नपणें उत्तर दिले :

हं, तें खरंच; पणं त्यांनी मला परत आपल्यांत घेतलं पाहिजे ना ? “

ब्रिटिश मजूर पक्षाचा स्वतः मी एक अभ्यासू आहें व त्या पक्षाच्या उत्कर्षापकर्षाकडे मी अगदी आस्थेनें लक्ष देत आलों आहे. या पक्षांत १९३१ साली जी फूट पडली, तिच्यामुळे माझ्या मनावर एक प्रकारचा खेदजनक परिणाम झाला व या पक्षाला नांवारुपाला आणण्यास ज्याचे कष्ट कारणीभूत झाले, इतकेच नव्हें तर या पक्षाचा जो केवळ प्राणदाताच होता, त्या रॅम्से मँक्डोनल्ड यांच्या हातून खुद्द स्वतःला व त्याच्या पक्षाला विनाशक ठरणारें वर्तन कसें पडलें, याचें मला राहून राहून आश्चर्य वाटत होते. १९३१ सालचें मजूर पक्षावर आलेलें गंडांतर जबरदस्त होते. यांत शंकाच नाही. या गंडांतरानें असें स्पष्ट दाखवून दिलें कीं, ” भांडवलवाला वर्ग हा हातीं “ राजकीय सत्ता नसतांही बहुसंख्यांक श्रमजीवि वर्गाला राज्यकारभार चालवू देण्याच्या कामी सहज प्रतिबंध करूं शकतो |

पेच प्रसंग

ग्रेटब्रिटन सधन असतांही १९३१ सालीं ब्रिटिश अंदाजपत्रकांचें wat पारडें बेसुमार जड झालें होतें. या अंदाजपत्रकातील खर्चाच्या दोन प्रमुख बाबींनी उत्पन्नाचा बराच मोठा लचका तोडला होता. महायुद्धाच्या खर्चासाठी काढलेल्या कर्जाच्या डोंगरापायीं द्यावे लागणारें भरमसाट व्याज ही त्यांपैकी एक बाब व बेकारीच्या कायद्याखाली (अनएम्प्लॉयमेंट इन्शुअरन्स .ऑक्ट) बेकार मजुरांना द्यावा लागणारा भत्ता ही दुसरी बाब : या अवाढव्य खर्चाच्या पायीं भांडवलदार वर्गावर करांचें जें जड ओझें पडलें होतें, ते हलकें करण्यासाठीं तो वर्ग खर्चातच काटाकाट करायला फार उत्सुक झाला होता. आपणावर शेकणार