रॅम्से मॅक्डोनल्ड व हिंदुस्थान - Page 262

२२० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

कोडे उलगडत नाही

या मतमेदाच्या संबंधात मला निःसंशयपणें असेच वाटतें कीं, हेंडरसन प्रभृतीचेंच म्हणणें रास्त होते व रॅम्से मँक्डोनल्ड व त्याचें सोबती यांचा विचार गैर होता. बेकारांचा तनखा कमी करण्याचें स्वत: होऊन पाप करणाऱ्या एखाद्या मजूरपक्षाला प्रधानमंडळ बनविण्याइतके अफाट संख्याबळ निवडणुकींत मिळविण्याची कधी तरी शक्‍यता आहे काय ? रॅम्से मँक्डोनल्ड यांनी त्या वेळीं ज्या धोरणाचा स्वीकार केला, तसा तो करण्यास त्यांना कोणतीं कारणें झाली असावीं याची मला अजूनही फोड झालेली नाहीं. पण त्याबरोबरच लक्षांत घेण्यासारखी गोष्ट ही कीं, त्या सालच्या गंडांतरानें मजूरपक्षाला रॅम्से मॅक्डोनल्ड यांची किती निरतिशय आवश्यकता होती हेंही दिसून आलें. हेंडरसनप्रभृति मंत्र्यांनी बेकार तनख्यांत कापाकापी करण्याला कसून विरोध केला; पण असें असूनही खुद्द त्यांना आपण निवडणुकींत यशस्वी होणार नाही असेंच वाटलें, या विलक्षण घटनेची फोड करणें कठीणच आहे. तथापि माझा निष्कर्ष या बाबतींत असा आहे कीं, .

कोणत्याही राजकीय पक्षाला कार्यक्रम, शिस्त व साधनसामुग्री यांची जितकी .

गरज असते, त्याहूनही त्याला आपल्या कर्तृत्वाने लोकमताला भारून

टाकणाऱ्या नेत्याची अधिक गरज असते.

मजूरपक्षाचा १९३१ च्या निवडणुकीनंतर जो बोजबारा उडाला, त्याचें कारण हेंच कीं, A मॅक्डोनल्ड यांच्या पक्षांतरामुळें रिकामी पडलेली जागा भरून काढण्याला मजूरपक्षांत एकही लायक पुढारी नव्हता, मॅक्डोनल्डमुळेंच मजूरपक्ष उभा होता; ते जातांच तो कोसळला | |

न्याय्य पण अनुदार धोरण

'मजूरपक्ष आपल्याला परत घेणार नाही', असे मँक्डोनल्ड यांनी माझ्यापाशी उद्गार काढले, तेव्हां मजूरपक्षाचें हें धोरण आत्मघातकी आहे असेंच मला वाटल्याखेरीज राहिलें नाही. त्या पक्षाचे तें धोरण न्याय्य असलें, तरी उदारपणाचे होते असें म्हणतां यावयाचे नाही. रॅम्से मॅक्डोनल्ड यांचा आपल्या सहकाऱ्यांशी झालेला हा कांही पहिलाच बेबनाव नव्हता. १९१४ सालीही ते आपल्या सहकाऱ्यांपासून असेच फुटले होते. भांडवलवाल्यांनी स्वार्थ साधण्यासाठी निर्माण केलेलें एक युद्ध या दुष्टीकोनानें ते महायुद्धाकडें पाहात होते. व त्यामुळेच त्यांचा महायुद्धाला भयंकर विरोध होता. पण मजूरपक्षातील त्यांच्या इतर सहकाऱ्यांना, युद्ध कोणी निर्माण केलें अथवा तें कोणाचें हित साधणार याचा विचार करण्याची ती वेळ नव्हें असें वाटत होते. आपल्या राष्ट्राच्या भवितव्यावर घाला पडत आहे, तेव्हां मजूर व भांडवलवाले यांनी हातांत हात घालून एकजुटीने पहिल्यानें देशाच्या स्वातंत्र्याचं रक्षण करावें असें त्या लोकांचें म्हणणें होते.