रॅम्से मॅक्डोनल्ड व हिंदुस्थान - Page 263

रॅम्से मँक्डोनल्ड व हिंदुस्थान २२१

केवळ शास्त्रोक्त मजूर तत्वांच्या दृष्टीनें विचार करतां मि. मँक्डोनल्ड यांची विचारसरणी रास्त होती व त्यांच्या विरोधकांची विचारसरणी मजूर मतद्रोहाची होती असेंच म्हणावे लागेल. तथापि महायुद्ध संपल्यावर मजूरपक्षीय जेव्हा आपली फिरून संघटना करण्यासाठी एकत्र आले तेव्हां मँक्डोनल्ड यांनी आपल्या त्या साऱ्या सोबत्यांना उदार मनाने क्षमाच केली व मजूरपक्षाची पुनर्घटना करण्यासाठी ते त्यांच्यातच पुनः सामील झाले. मँक्डोनल्ड यांचा हा उमदेपणा पाहिला म्हणजे मला तर असेंच म्हणावेंसें वाटते कीं, मँक्डोनल्ड यांना १९३१ साली वाळींत टाकणाऱ्या त्यांच्या सोबत्यांनी त्यांना या वेळीं क्षमा करून आपल्या मनाचा मोठेपणा दाखविणें रास्त होते. |

स्वार्थ ?

मि. मँक्डोनल्ड यांच्या वागणुकीने व धोरणाने मजूर पक्षांत जी फाटाफूट घडून आली, ती त्यांच्या कार्याला काळीमा आणणारी झाली असें मानण्यांत येते. ज्या मजूरपक्षाला त्यांनी जन्म दिला व ज्याचें त्यांनी संवर्धन केले, त्या पक्षाच्या नाशाला अखेरीस ते स्वत:च कारण झाले ही मँक्डोनल्ड यांच्या हातून अक्षम्य चूक घडली यांत शंकाच नाही. त्यांच्या या कृत्याचा संबंध त्यांचे टीकाकार कसेंही करून मुख्य प्रधानकीला चिकटून राहण्याच्या त्यांच्या स्वार्थी महत्वाकांक्षेला लावतात. टीकाकारांचे हें म्हणणें योग्य अथवा अयोग्य आहे असें म्हणण्याला कोणतेंच साधन उपलब्ध नाही. पण यासंबंधात मला मात्र एका सद्गृहस्थाकडून असे ठामपणे सांगण्यांत आले कीं, मँक्डोनल्ड यांनी मजूरपक्षाशी जी प्रतारणा केली ती कांही त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी नव्हती, तर ती केवळ हिंदुस्थानचेच हित साधण्यासाठी होती | ही माहिती देणारे गृहस्थ मँक्डोनल्ड यांचे निकटस्नेही व सहकारी होते. या सद्गृहस्थांच्या सांगण्यावरून असें दिसतें की, आपण मागें पाय घेतल्यास काँझर्वेटिव पक्ष सत्ताधीश होईल व तो हिंदी सुधारणांची योजना मध्यवर्ती जबाबदारी देण्याइतकी विस्तृत होऊ न देतां ती सायमनकमिशनच्या शिफारशीप्रमाणे स्वायत्ततेपुरती मर्यादित करून ठेवील अशी रैंम्से मॅक्डोनल्ड यांना भीती वाटत होती.

गांधीचे पत्रक

हे कारण संयुक्तिक होते असें मी तरी म्हणणार नाही. तथापि इतके खरें कीं दुसऱ्या रा. टे. परिषदेच्या वेळी म्हणजे गांधी ज्या अधिवेशनाच्या वेळी रा. टे. परिषदेत हिंदुस्थानची फक्त प्रांतिक स्वायत्ततेदरच बोळवण करण्याच्या बऱ्याच

वाय ६४१-१७