222 डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
कारवाया चालल्या होत्या व त्या सर्व मॅक्डोनल्ड होते म्हणूनच फसल्या. दुसऱ्या रा. टे. परिषदेच्या वेळी कांहीं धूर्त ब्रिटिश मुत्संद्यानी गांधींना मथवून त्यांच्याकडून आम्हांला प्रांतिक स्वायत्तता दिली म्हणजे भरपूर झाले. मग आणखी कांही नको अशा आशयाचें कसें प्रसिद्ध करविले हें कैक हिंदी पुढाऱ्यांना ठाउक असेलच. या अचरट मागणीला विरोध करण्यासाठीं बाकीच्या हिंदी प्रतिनिधिनाही | एक पत्रक काढून “ हिंदी लोक निवळ प्रांतिक स्वायत्ततेला राजी नाहीत “ असें तेव्हा जाहीर करावें लागलें होते, व त्याही पत्रकावर सही करण्यास गांधींना भाग पाडले होते. हा इतिहास पुष्कळांच्या स्मरणांत असेलच पण जनतेच्या कानापर्यंत न पोहोचलेली अशी दुसरीही एक महत्वाची घटना त्यावेळी घडून आली होती. ती अशी कीं, हिंदुस्थानला सायमन साहेबांच्या शिफारशींबाहेर एक तसूभरही जागा देण्यास तयार नसलेल्या कॉन्झर्वेटिव् पुढाऱ्यांनी गाधींच्या प्रांतिक स्वायत्ततेच्या मागणीला घट्ट चिकटून राहून इतर प्रतिनिधींनी काढलेल्या दुसऱ्या पत्रकाची वास्तुपुस्त करण्याचेही नाकारले. आणि असें करण्यास त्यांनी कारण काय दाखवलें, तर म्हणे हिंदुस्थानांत एकटें गांधींच काय तें मानले जातात ! इतरांना तेथें कोणी पुसत नाही : गांधींच्या त्या अचरट पत्रकापासून हिंदुस्थानचा त्या वेळी जर कोणी ब्रिटिश मुत्सद्यांने बचाव केला असेल, तर तो मॅक्डोनल्ड यांनीच ; दुसऱ्या कोणीही नव्हे.
ब्रिटिश मंत्रिमंडळानें अखेरीला गांधींच्या पत्रकाचा पुरा फायदा घेउन आपली
शेवटची योजना निश्चित करण्यापूर्वी रा. टे. परिषदेला बोलविलेल्या निरनिराळ्या प्रतिनिधींच्या मुलाखती घेऊन त्यांचे विचार अजमावण्याचें ठरविले. अशा मुलाखती घेण्यासाठी त्यावेळी मि. मॅक्डोनल्ड-सर सॅम्युअल होअर व लॉर्ड संकी , या तिघांची कमिटी नेमण्यांत आली व या कमिटीकडून प्रतिनिधींच्या भेटी घेऊन, गांधी म्हणतात त्याप्रमाणें हिंदुस्थान फक्त प्रांतिक स्वायत्तता स्वीकारायला तयार होईल कीं काय याचा अंदाज घेण्यांत आला. या कमिटीने किंती प्रतिनिधींच्या मुलाखती घेतल्या हें मला निश्चित ठाऊक नसलें, तरी ना. आगाखान, सर तेजबहादूर सप्रू व मी अशा आम्हां तिघांच्या मुलाखती या कमिटीनें घेतल्या व आम्ही कमिटीला असें निक्षून सांगितलें कीं, हिंदुस्थान केवळ प्रांतिक स्वायत्ततेला तर राजी होणार नाहींच, पण मध्यवर्ती जबाबदारी जर देण्यांत आली नाही, तर हिंदुस्थानांत शांततेची आशा करावयास नको, याचीही ब्रिटिश मंत्रिमंडळाने खात्री - बाळगावी. गांधींनी कॉन्झर्वेटिव् पक्षाबरोबर केलेले संगनमत जर यशस्वी झाले असते, तर हिंदुस्थानांत कल्लोळ माजला असता यांत तिळमात्र शंका नाही. जातां जातां यासंबंधात मला ना. जयकर यांनी या विधिघटनेसंबंधांत काढलेले मननीय उद्गार येथें नमूद करावेसे वाटतात :