रॅम्से मॅक्डोनल्ड व हिंदुस्थान - Page 265

रॅम्से मँक्डोनल्ड व हिंदुस्थान २२३

गांधींचा पुतळा

आंबेर ` डकर ' काय हो आंबेडकर “ जयकर म्हणाले, “ या कॉन्झर्वेटिवांनी गांधींचा पुतळा उभारल्याचे दृष्य लवकर दिसेल असें तुम्हांला नाही वाटत ? ”

ना. जयकर यांचे म्हणणें अक्षरश: खरें होते. गांधी कॉन्झर्वेटिव्‌ पक्षावर जो उपकार करूं पाहत होते, तो त्यांनी कृतज्ञतेने गांधींचा पुतळा उभारण्याच्याच मासल्याचा होता. पण हा प्रसंग मि. मँक्डोनल्ड यांच्यामुळेंच टळला. त्यांनीच त्या वेळी आमच्या या महात्म्यापासून हिंदुस्थानच्या भवितव्याचा संभाळ केला. ज्या हिंदी प्रतिनिधींचे मॅक्डोनल्डविषयीं प्रतिकूल मत बनलें आहे, त्यांनी या घटनेवर अवश्य विचार करावा व मगच आपलें मत बनवावें. कांहीं हिंदी लोकांचा मँक्डोनल्ड यांच्या धोरणाविरूद्ध मोठा आक्षेप आहे. पंरंतु तो तसा कां असावा हें मला कळत नाही. फेडरेशनची योजना व जातीय निवाडा या दोन पापाचें खापर मि. मॅंक्डोनल्ड यांच्या डोक्यावर नेहमी फोडण्यात येतें. पण माझ्या मतें तर या दोहोंचाही दोष मॅक्डोनल्ड यांच्याकडे पोहोचत नाही. कारण फेडरेशनला सध्यां जें विकृत स्वरुप आलें आहे व घटनाकारानें ज्यावर आतां कायदेशीर शिक्कामोर्तब केलें आहे, त्याची सारी जबाबदारी गांधीं, सप्रू व शास्त्री या तिघांवरच पडते. या फेडरेशनच्या योजनेतील एक मोठी अनिष्ट बाब ही कीं, जबाबदार राज्यपद्धति अस्तित्वांत येणे-न येणें हे संस्थानिक फेडरेशनमध्यें दाखल होण्या-न-होण्यावर अवलंबून आहे. या ग्यानबाच्या मेखेमुळेच ब्रिटिश हिंदुस्थानला .संस्थानिकाशी कशाच बाबतींत सौद्याची भाषा करतां येत नाहीं व त्यांना संस्थानिकांच्या मर्जीवर अवलंबून राहावें लागतें. वास्तविक संस्थानिकांच्या संबंधांत ब्रिटिश हिंदुस्थानची अशी कुचंबणूक होतां नये होती. परंतु ती झाली खरी आणि त्याला जर कोणतें एक कारण असेल, तर तें--

मॅक्डोनल्ड यांच्या कारवाया हे नव्हे, तर हिंदुस्थानच्या उपरोक्त विश्वासू

पुढाऱ्यांनी ब्रिटिश हिंदुस्थानचे सारें हितसंबंध बुद्धिपुरस्सर संस्थानिकांना

सोडून दिलें, हेंच होय.

रा. टे. परिषदेच्या ब्रिटिश प्रतिनिधींना मध्यवर्ती जबाबदारी स्थापन करण्याच्या बाबीसंबंधांत, मध्यवर्ति कायदेमंडळांतील ब्रिटिश हिंदुस्थानच्या प्रतिनिधींच्या आत्यंतिकपणाला. आळा घालणारी कांही तरी व्यवस्था अथवा -बंधन- मध्यवर्ति घटनेंत असावें असें वाटत होते. असा आळा घालणारी एखादी योजना हवीच असल्यास ती कोणत्या तर्‍हेनें. अस्तित्वांत आणावी यासंबंधाने मी एक योजना [पुढे ] मांडली होती. . संस्थानिकांच्या प्रतिनिधीऐवजीं, मध्यवर्ती -कायदे मंडळांत एक. सरकारनियुक्त गट निर्माण करण्यांत यावा ही ती योजना होय. अशा