२२४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
सरकारनियुक्त गटांमुळें दोन उद्देश साधले असते. एक तर ब्रिटिश प्रतिनिधींची नियंत्रणाची मागणी पुरी झाली असती, व दुसरें म्हणजे मध्यवर्ती जबाबदारीची स्थापना संस्थानिकांच्या येण्या-न-येण्यावर अवलंबून राहती ना. शिवाय त्यामुळें मध्यवर्ति जबाबदारीच्या स्थापनेबद्दल धास्ती न राहिल्यामुळे ब्रिटिश हिंदुस्थानला संस्थानिकांशी बरोबरीच्या नात्यानें सवलतीच्या बाबतींत फायदेशीर सौदा पाडतां आला असता व संस्थानी प्रजेलाही कदाचित् आपले प्रतिनिधी निवडण्याचा हक्क, यापुढे साधणार नाहीं, इतक्या उत्तम रीतीनें मिळवून देतां आला असता. मी मांडलेली ही योजना अशा रीतीनें ब्रिटिश प्रतिनिधींनी मांडलेल्या व आतां घटनाकायद्यांत नमूद झालेल्या योजनेपेक्षा भिन्न, पण तितकींच संपूर्ण कशी होती हें यावरून दिसून येईल.
मेंक्डोनल्ड दोषी नाहींत
माझ्या या योजनेचा स्वीकार झाला नाहीं हें खरें; पण तो मि. मॅक्डोनल्ड यांच्या उपेक्षेमुळें झाला असें मात्र मी मुळींच म्हणणार नाही तर सप्रू शास्त्री व गांधी या ब्रिटिश हिंदुस्थानच्या तीन प्रतिनिधींनी या योजनेला आपला पाठिंबा दिला नाही म्हणूनच माझी सूचना फेटाळली गेली ! सर तेजबहादूर सप्रू यांनी सरकारनियुक्त गटापेक्षा संस्थानिकांच्या प्रतिनिधींच्या योजनेला आपली पसंती दर्शविली हे पाहून मला आश्चर्यच वाटले; सप्रूंसारख्या पुढाऱ्यानें हवा तेव्हां नष्ट करतां येण्यासारख्या सरकारचनियुक्त गटाऐवजी संस्थानिकांच्या कायम होऊन बसणाऱ्या ' गटाला मान्यता द्यावी, याला काय म्हणावे ? मला तरी त्यांच्या या विचारसरणीचे अद्यापि कोडेच आहे. तेव्हा मला असें म्हणावेसे वाटतें कीं,
फेडरेशनच्या चालू घाणेरड्या स्वरुपाला जर खरोखर कोण जबाबदार असतील तर ते हे आमचे हिंदी देशभक्तच होत. मॅक्डोनल्ड नव्हेत.
सर मॅक्डोनल्ड यांच्या डोक्यावर कम्युनल अवॉर्डचेंही खापर फोडलें आहे. पण या बाबतीतही त्यांना मुळींच दोष लागू होत नाही. असें मी ठांसून म्हणेन. कम्युनल अवॉर्डमधील अनिष्ठ योजनेला we हिंदी लोक, विशेषतः हिंदुच जास्त कारण आहेत. माझें हे विधान अनुदारपणाचें दिसेल खरे; पण खरें सांगायचें तर जगांतील इतर मिरासदारांना (Haves) हे कळतें, ते हिंदुंना अद्यापि कळत नाही अशी माझी प्रामाणिक समजूत आहे. एखादी मिरास आपल्यापुरतीच राखून ठेवायची असती, तर तिच्यांत इतरांना भागीदार करून घेतलें पाहिजे; इतरांना त्यांतील वांटा दिला नाही, तर सगळेच गमावण्याची नक्की पाळी येते असा रोजच्या व्यवहाराचा अनुभव आहे. रा. टे. परिषदेत हिंदुंचे जातीय तडजोडीसंबंधांचें धोरण अधपासून इतिपर्यंत मूर्खपणाचे होते. या धोरणांत