TRI मँक्डोनल्ड 'व हिंदुस्थान २२५
विधायक अशी कसलीच बाजू नव्हती. हिंदूंनी उठल्या-सुटल्या हाकाःमारीत 'बसण्याइतकें त्या :अवॉर्डांत आहे a -काय याचा मला अजून बोध झालेला नाही. : अवॉर्डला आमचा विरोध आहे असें सर्वसाधारणपणे सर्वच म्हणतात; पण त्यांत अमुक एक. बाब हानिकारक आहे, असें AS स्पष्टपणें एकानेंही या घटकेपर्यत दाखवून . दिलेलें नाही. 'माझ्या स्वत:च्या. दुष्टींने अक्षम्य व असमर्थनीय दिसणारी. अशी कम्युनल अवॉर्डात एकच बाब-आहे. ती ही कीं, हें अवॉर्ड अल्पसंख्याकांचा विरोध असतांही कांही कांही प्रांतांत . बहुसंख्यांक वर्गाला, कायदेशीर रीतीनें. स्वतंत्र मतदार संघ देतें. पण असें. होण्याला तरी 'जबाबदार कोण ? मी तर म्हणेन कीं, याबद्दलही स्वतः. हिंदुच जबाबदार होत. स्वतंत्र मतदार संघाला आपण संमति देणार-हाही असा विरोधी हेका हिंदु फक्त धरून बसले होते... पण येणे. करून अवॉर्ड मुसलमानांना ग्राह्य व-किंबहुना कमी हानिकारक होईल अशी एकही विधायक सूचना पुढें. मांडण्याची त्यांनी तत्परता दाखविली नाही, कम्युनल अवॉर्डच्या त्रांगड्यांतून मार्ग काढण्याला एक युक्ति होती. परंतु हिंदुंना “ देवाण-घेवाण “ करण्याचे तंत्र-अवगत असेल तर ना या गोष्टी. ?: या जातीय प्रश्नाच्या गोंधळातून मार्ग-काढण्याची माझी एक योजना होती व मीं ती ऑक्सफर्ड येथील प्रोफेसर मि. एडवर्ड टॉम्सन यांच्या कानावरही घातली होती. माझी ही. योजना अशी कीं, स्वयंनिर्णयाच्या तत्वानुसार दर प्रांतांत अल्पसंख्यांक समाजांला, :स्वतंत्र अथवा संयुक्त, यांपैकी इवा .तो मतदारसंघ निश्चित करण्याचा हक्क द्यावा;'. मतदारसंघाचा प्रश्न बहुसंख्यांक समाजावर सोंपविला जाऊं नये. - माझी ही सूचना: अंमलांत आली असती, तर कम्युनल अवॉर्डचें आज जे स्वरुप. दिसतें आहे त्यापेक्षा ते निराळें
दिसले असतें.
माझ्या योजनेचा फायदा
माझ्या या योजनेमुळे काय फायदा झाला असता तो पहा. पंजाब, बंगाल, सिंध व सरहद्द प्रांत या ठिकाणच्या अल्पसंख्य हिंदू समाजाच्या इच्छेमुळें या प्रांतांत संयुक्त मतदारसंघ अस्तित्वात आलें असते व इतर प्रांतांत अल्पसंख्यांक _ मुसलमानांच्या इच्छेनुसार स्वतंत्र मतदारसंघ स्थापन झालेले दिसले असते. मांझ्या या योजनेमुळें सरसहा संयुक्त मतदारसंघ असावे ही हिंदु मागणी व-सरसंहा स्वतंत्र 'मतदार संघ असावे ही मुसलमानी मागणी या दोन टोकांच्या मागणीतील सुवर्णमध्य साधला गेला असता. प्रो. टॉम्सन यांना ही योजना पसंतच पडली-इतकेच नव्हे,