रॅम्से मॅक्डोनल्ड व हिंदुस्थान - Page 268

QE डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

तर लगेच त्यांनी ती समजावून देण्यासाठी पं. मालवीयांकडे त्यांनी मला नेलें. पण दुर्दैवाची गोष्ट ही कीं, पं. मालवीयांनी आमची दारुण निराशा केली | सर्वत्र संयुक्त मतदार संघ अस्तित्वांत आणण्याचा आपला हेका तें सोडीनांत व इतकंच नव्हे, तर ब्रिटिश सरकार हिंदुस्थानांत कोणत्याही जातीला स्वतंत्र मतदारसंघ बहाल करण्याची कारवाई करणार नाही, असें त्यांना भाविकपणें वाटत असल्यामुळें माझी सूचना पुढें मांडण्याचीही त्यांना आवश्यकता भासली नाही ! कम्युनल अवॉर्डसारखी ही हानिकारक बाब म्हणजे पं. मालवीयांसारख्या हिंदुंचा आपल्या प्रतिपक्षाचें कांही कांही चालूं न देण्याच्या दुराराध्य व हेकेखोर धोरणाचें व ब्रिटिश सरकारवरील दुधखुळ्या भकितिचें दृश्यफल होय. हिंदु प्रतिनिधिंनी माझ्या सूचनेला पाठिंबा दिला असता तर, ब्रिटिश सरकारची तिला मान्यता मिळाली असती यात शंकाच नाही. ही खात्री बाळगण्यास मला दोन आधार आहेत. जॉ. पा. कमिटीच्या बैठकीह्ून येण्यापूर्वी लॉर्ड झेटलंडप्रभूति कमिटीच्या कांही सभासदांच्या मी भेटी घेतल्या होत्या व या भेटींत त्या त्या सभासदांना कम्युनल अवॉर्डमुळें होणारा अन्याय पटवून दिला होता. मी हा खटाटोप केला, तो अन्याय झालेल्या पक्षाबदृदल मला जिव्हाळा वाटत होता म्हणून नव्हे, तर केवळ न्यायप्रेमाखातरच मला तसें करावेंसे वाटलें आणि सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे मीं ज्यांच्या भेटी घेतल्या, त्यांपैकी बऱ्याच जणांनी माझ्या सूचनेला पाठिंबा दिला. लॉर्ड झेटलंड यांना तर माझी योजना मनापासून पसंत पडली व त्यांनी सुधारणाकायद्याचे बिल लॉर्डाच्यापुढे चर्चेसाठी येईल तेव्हां माझ्या सूचनेनुरुप कम्युनल अवॉर्डला उपसूचना आणण्याचें अभिवचन दिलें आणि खरोखरच त्यांनी पुढें तसें केलेही. येथे मँक्डोनल्ड यांच्यासंबंधांत हें मुद्दाम नमूद केले पाहिजे कीं, त्यांना तर माझ्या योजनेची उपयुक्तता सर्वस्वी पटली होती, व

आपल्या स्वत:च्या खासगी उपयोगासाठी त्यांनी मला कम्युनल अवॉर्डावर

एक विस्तृत व खुलासेवार टांचण लिहून तयार करण्यासही सांगितले होते,

त्यांच्या इच्छेप्रमाणें मी एक विस्तृत टांचण तयार करून ते त्यांना सादरही केले

होते.

परंतु त्यानंतर त्यांनी मला पत्र लिहून त्या घटकेला आपल्याला कम्युनल

अवॉर्डच्या बाबतींत कांहीं करतां येण्यासारखें कळविलें. त्यांना माझी योजना

अमान्य होती असा याचा अर्थ नव्हे; तर माझी सूचना अंमलात. आणल्यास त्या