रॅम्से मँक्डोनल्ड व हिंदुस्थान २२७
योगानें मुसलमान रुष्ट होतील व हिंदुही असंतुष्ट राहतील असें वाटलें म्हणूनच त्यांनी त्यावेळी कांही न करण्याचें ठरविलें. माझ्या योजनेला पं. मालवीयांसारख्या हिंदूंचा पाठिंबा असता तर मि. रॅम्से मँक्डोनल्ड यांनी ती अंमलांत आणण्याला आपली पराकाष्ठा केली असती याबद्दल मला मुळींच संशय नाही. हा सारा तपशील मी येथे. देण्याचें कारण मँक्डोनल्ड यांच्या धोरणाबाबत पसरलेल्या गैरसमजाचें शक्य तो वस्तुस्थिति सांगून निराकरण करावें हेंच आहे.
मॅक्डोनल्ड हे पक्षद्रोही असतील, पण ते हिंदुस्थानचे मित्र होते व त्यांनी आपला स्नेहभाव कृतींत उतरण्यासाठी प्रामाणिकपणे खटपटही केली होती.
विविध वृत्त, ता. २१ नोव्हेंबर १९३७.