गांधी महात्मा आहेत काय ? २२९
आहे. या तत्वांची शिकवण बुद्धानें पूर्वी दिलेली आहे, आणि एकाद्या अभिजात निर्बुद्ध इसमाखेरीज दुसरा कोणीहि तिचे श्रेय.गांधींना देणार नाही. ` मानवी संस्कृतीच्या संरक्षणासाठीं सत्य व अहिंसा या दोन तत्वांची आवश्यकता आहे, हैं आतां कोणी नव्यानें शिकविण्याचे कारण नाही. मी वर म्हटल्याप्रमाणे ही गोष्ट कित्येक शतकांपूर्वी बुद्धाने शिकविलेली आहे. त्यांत गांधींचे नवीन असें कांहीं नाहीं. सत्य आणि अहिंसा यांच्या प्रयोगासंबंधी वारंवार उद्भवणाऱ्या कट
- प्रश्नांवर जर गांधींनी प्रकाश पाडला असता तर ते महात्मा या पदवीला पात्र झाले असते,- आणि जगहि त्यांचें सदैव ऋणी राहिलें असतें. सत्यकथन केव्हां करावे? हिंसा समर्थनीय केव्हां समजावी ?' या दोन कोड़यांच्या उत्तरांची जग आतुरतेने वाट पहात बसलें आहे. बुद्धाच्या मतें सत्य व अहिंसा या तत्वांचा
प्रयोग साध्याच्या दृष्टीनें करावा (attitude to truth and non-violence should be pragmatic). या प्रश्नाचे उत्तर येशू खिस्तानें काय दिलें असतें तें कळण्याला दुर्दैवाने मार्ग नाहीं-कदाचित् पायलटनें (Pilate) त्याला उत्तर देण्यास पुरेसा वेळ दिला नसावा ! गांधींनी या प्रश्नाचें कांही उत्तर दिलें आहे काय ? मला तर कांहीं दिसत नाही. आणि त्यांच्या शिकवणीपुरता विचार केला तर ते दुसऱ्याच्या भांडवलावर आपला धंदा चालवीत आहेत असें मी बिनदिक्कत म्हणूं शकतो. सत्य आणि अहिंसा हे कांही त्यांचे शोध नव्हेत.
गांधींच्या शीलासंबंधी विचार करतां माझा ग्रह असा झालेला आहे कीं या माणसांत कळकळीपेक्षा काचा अधिक आहे. माझ्या मतें त्यांच्या प्रत्येक कृत्याचा : नाद खोट्या नाण्याचा आहे, आणि त्यांची नम्रता डेव्हिड कॉपरफिल्डमधील उरायाहीपच्या नम्रतेसारखी आहे. स्वतःला सर्वाच्या पुढे आणून बसविण्याची कामगिरी त्यांनी फार कौशल्याने साधली आहे. ज्या व्यक्तीचा आपल्या कर्तबगारीवर, कळकळीवर व आपल्या संदेशाच्या सत्यतेवर अतुल विशवास असतो ती व्यक्ति समोरून हल्ला करून आपलें स्थान दृढ करते. बगलेकडून छापा घालण्याची तिला कधी आवश्यकता वाटत नाही. नेपोलियन आघाडीवर हल्ला करीत असे. बाजूबाजूनें छापे घालण्याचे तंत्र कमकुवत सेनानींनी शोधून काढलेलें आहे. गांधी नेहमीं याच तंत्राचा अवलंब करीत आहेत. अनेक वर्षेपर्यंत ते स्वतःला गोखल्यांचा विनम्र अनुयायी म्हणवीत असत. कित्येक वर्षेपर्यंत त्यांनी टिळकांची स्तुति करण्याचा क्रम चालू ठेवला होता. ते टिळकांचा द्वेष करीत असत, ही गोष्ट प्रत्येकाला ठाऊक आहे. तरीपण टिळकांच्या नांवाचा उपयोग केल्यावांचून आपणाला एक कोटीचा स्वराज्य फंड उभारता येणार नाहीं हें पूर्णपणें ओळखून त्यांनी आपल्या खाजगी भावना बाजूला सारल्या आणि.