230 डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
कसलेल्या मुत्सद्याचें कसब चालवून त्या फंडाला टिळकांचे नांव जोडले. खरें पाहिलें तर खिश्चन धर्माचे हिंदुस्थानांतले ते कट्टर विरोधक आहेत. पण पाश्चात्य जगाला खूष करण्यासाठी, संकटसमयी आपण नेहमी बायबलकडे धांव घेतो, असे. ते हमेशा बयाण करीत असतात. त्यांच्या मानभावीपणाची आणखी दोन उदाहरणें ` मजपाशी आहेत. वर्तुळ परिषदेच्या वेळी अल्पसंख्यांक कमिटीच्या बैठकींत त्यांनी असे कबूल केले होतें कीं, इतर प्रतिनिधींनी दलित वर्गाच्या (Depressed Classes) प्रतिनिधित्वाच्या मागणीला मान्यता दिली तर त्याला आपण कोणत्याहि प्रकारची हरकत घेणार नाही; आणि इतर सर्व प्रतिनिधींनी जेव्हां ही मान्यता दिली तेव्हां त्यांनी जें वर्तन केलें त्याला मी विश्वासघात हेंच नांव देऊं शकतों. ते मुसलमानांकडे जाऊन त्यांच्या कानाला लागले आणि त्यांना म्हणाले की, “ तुम्ही जर दलित वर्गाच्या मागण्यांना विरोध करण्याचें कबूल कराल. तर मी तुमच्या चौदाच्या चौदा मागण्या मान्य करीन. “ एकाद्या घोटीव बदमाषानेंहि असलें नीच कपट केले नसतें. सध्यांची हिंदु-मुसलमानांची तेढ हीहि त्यांच्या अशाच एका कपटाचरणाची औरस संतति आहे. नेहरूकमिटीचा रिपोर्ट काँग्रेसच्या खुल्या अधिवेशनांत जेव्हां चर्चेसाठी आला तेव्हां त्याला काही दुरुस्त्या सुचविण्यांत आल्या होत्या हें पुष्कळांना माहित असेल. आणित्या दुरुस्त्यांना जयकरांनी विरोध केला, हेंहि प्रसिद्ध आहे. परंतु या दुरुस्त्या कां सुचविल्या गेल्या आणि त्यांना जयकरांनी कां आणि कसा विरोध केला याची माहिती लोकांना असावी तितकी नाही. यासंबंधीची जी हकीकत मला ठाऊक आहे (ती जर खरी असेल, आणि तिच्या खरेपणाबद्दल संशय घेण्याला मला जागा' नाही, कारणं या खेदकारक प्रकरणांत प्रमुख भाग घेणाऱ्यांकडूनेच मला ती समजली आहे) ती अशी कीं हा सारा प्रकार गांधींनी आपले सहकारी पं. मोतिलाल नेहरु आणि मुसलमान समाज यांच्याशी जो कमालीचा विश्वासघात केला त्यामुळे घडून आला. नेहरु कमिटीच्या रिपोर्टाला ज्या दुरुस्त्या सुचविण्यांत आल्या होत्या त्या, तो रिपोर्ट मुसलमानांना स्वीकार्य व्हावा म्हणून पं. मोतिलाल नेहरु आणि जिना यांना परस्परमान्य झालेल्या अशा होत्या. पण गांधींना जेव्हां हें कळलें तेव्हां त्यांना असें वाटलें कीं, आपण मुसलमानांना जें द्यायला तयार होतों त्यापेक्षा पंडित मोतिलाल नेहरुंनी अधिक दिले होतें आणि पंडित मोतिलाल नेहरुंचा पडाव करंण्याच्यां अट्टाहासाने प्रेरित होऊन त्यांनी या दुरुस्त्याना विरोध -करण्यासाठी जयकरांचाः उपयोग करून घेतला. (Mr. Jayakar was hired, by Mr. Gandhi, to oppose them) जो. इसम दलित वर्गाचा व मुसलमानांचा मित्र म्हणून मिरवतो त्यानें, दिलेली वचनें पाळण्याच्या जबाबदारीतून निसटून जाण्यासाठी भुयारी मार्गाचा अवलंब करावा,