गांधी महात्मा आहेत काय ? २३१
हा विचार खरोखर उद्देगजनक आहे. “ मुखमे राम बगलमें छुरी “ अशा प्रकारच्या माणसाला जर महात्मा म्हणतां येत असेल तर मोहनदास गांधी हे महात्मा आहेत.
“चित्रा “ च्या संपादकांना त्यांच्या मागणीपेक्षा मी अधिक दिलें आहे. आणि ' चित्रा “ च्या वाचकांना जेवढें चावून पचवितां येईल त्यापेक्षा कदाचिंत मी अधिक सांगितलें असेल. आणखी दोन गोष्टींचा उल्लेख करून मी हां लेख संपवितो. रानडे, गोखले, आगरकर आणि टिळक यांचे युग हें कदाचित गांधीयुगाइतकें आंदोलनमय आणि अपेक्षामय नसेल, पण तें ज्ञानयुग होते याबद्दल माझ्या मनांत बिलकूल शंका नाही, गांधीयुग हे भारतवर्षाचें तमोयुग आहे. त्यावेळचें राजकारण उफाळणारें नसलें तरी प्रामाणिक होतें. उलट गांधींचे राजकारण उफाळणारें आणि खळाळणारें असलें तरी ते हिंदुस्थानच्या आतापर्यंतच्या कोणत्याहि राजकारणापेक्षा अधिक अप्रामाणिक आहे राजकारणाच्या अध्यात्मीकरणाचें पुण्याहवाचन करून त्यांनी त्याची परिसमाप्ती व्यापारीकरणानें केली. पण यांत नवल तें काय ? " मीठच जर अळणी झालें तर त्याला खारटपणा कशानें आणणार ? “ असें येशू ख्रिस्त फँरिसिजना (Pharisees) म्हणाला नव्हता काय ?
राजकारणातील गांधींच्या या बुवाबाजीचा नायनाट कसा करावयाचा हा या घडीचा दुसरा आणि अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. हिंदी जनता ताळ्यावर येऊन या महात्म्याच्या विचित्र लहरीप्रमाणे नाचण्यापेक्षा स्वतंत्रपंणे आपलीं मते. बनवूं लागण्याची वेळ येण्यापूर्वी कदाचित बराच कालावधि लोटेल. बहुसंख्य जनता ही अद्यापपर्यंत अडाणी आणि पशुतुल्य राहिली आहे. हा सर्वस्वी तिचाच दोष नसेल. वरिष्ठ वर्गांनी तिला मुद्दामच अज्ञानांत डांबून ठेवले आहे. कारण कांही असो. वस्तुस्थिति अशी आहे. निव्वळ बुद्धीच्या जोरावर या महात्म्याच्या विरूद्ध लढा चालविणे शक्य नाही. दैवी चमत्कारांविरूद्ध कोरडा तकवाद, असा हा लढा आहे. निव्वळ तर्कवाद चमत्कारांची झांपड केव्हाहि दूर करूं शकणार नाहीं. या परिस्थितींत मला असें सुचवावेसे वाटतें की, या महात्म्याचा निकाल लावण्यासाठी देशातील, इतर महात्म्यांनी राजकारणात शिरून आपापले राजकीय पक्ष स्थापावे म्हणून त्यांचे मन वळविण्याचे प्रयत्न करावे. हिंदुस्थानांत अशा महात्म्यांचा मुळींच तुटवडा नाही, उपासनीबुवा, दादामहाराज, मेहेरबाबा, नारायणबुवा केडगांवकर हे व यांच्यासारखे इतर अनेक बुवा हिंदुस्थानांत आहेत. अनेक अज्ञ लोकांना भुरळ पाडून त्यांना आपल्या जाळ्यांत अडकविण्याची