गाँधी महात्मा आहेत काय ? - Page 274

  1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

कला त्यांना अवगत.आहे. गांधींच्या पेक्षा त्यांच्या अनुयायांची संख्या लहान आहे ही गोष्ट खरी. पण त्यांची नालायकी हें याचें कारण नव्हे. हिंदी जनतेला मोक्षाबरोबरच राजकीय स्वातंत्र्यहि प्राप्त करून देण्याचें सामर्थ्य आपल्या अंगी , आहे याची जाणीव, कांही कारणानें, त्यांना अद्याप झालेली नाही, हेंच तें कारण होय... गांधींचा प्रभाव या त्यांच्या दुहेरी धोरणामुळे शक्य झाला आहे. ते लोकांना. दोनहि-अध्यात्मिक आणि राजकीय-मोक्ष मिळवून देण्याचें आश्वासन देतात. माझी खात्री. आहे कीं, उपासनी, दादामहाराज, मेहेरबाबा, नारायण महाराज. वगैरे बुवांनी गांधींचे धोरण स्वीकारलें तर गांधींच्या नांवाचा टिळा लावणाऱ्या पक्षाशी मुकाबला करणारे पक्ष तें नि:संशय स्थापन करूं शकतील, अनेक पक्ष अस्तित्वात असण्यांत, देशाचे निदान तूर्त तरी, कल्याण आहे. या विविध बुवापुढान्यांचे; पक्ष स्थापन. होण्यान्नें जी स्पर्धा निर्माण होईल तिच्यामुळे गांधी उपासनीप्रभूति, बुवा, ज्या. प्रमाणें पुराणांतील . सुदोपसुंद एका अप्सरेकरितां एकमेकांचा नाश करण्यास सिद्ध झाले त्याप्रमाणें, परस्परांचा माश करतील आणि यदाकदाचित तसें न झालें व तें.केवळ प्रतिस्पर्धी ठरले तरी तेंहि चांगलेच होईल. त्यामुळे निदान जे फॅसिझम्‌ आज बोकाळले आहे तें तरी दूर होईल. एकंदरींत असें दिसते कीं, दुसऱ्या. कोणत्या तरी महात्म्याने पुढें सरसावून आपल्या विशिष्ट ध्येयाचा झेंडा फडकविण्यात हिंदुस्थानचा बौद्धिक मोक्ष आहे. ही चेष्टा नव्हे. मी हें अगदीं गंभीरपणे लिहीत आहे. उपासनी, दादा महाराज, मेहेरबाबा किंवा नारायणबुवा यांचा एकादा शिष्य आपल्या महाराजांचे याबाबत मनं वळवून हिंदी लोकांवर उपाय करील काय ? इतर लोक त्यांना धन्यवाद देतीले किंवा नाही मला सांगवंत नाही. पण माझ्यापुरतें बोलायचे तर मी या बुवांना असें आश्वासन देऊं इच्छितों कीं या कृपेबद्दल मी कर्तव्यबुद्धीनें परमेश्वरापाशी त्यांचा सदैव ऋणी राहीन

@ © @

चित्रा : दिवाळी. अंक, ऑक्टोबर १९३८.