८२
लबाड कोण ? कॉंग्रेस की मजूरांचे पुढारी |
संपाच्या कायद्यासंबंधाने काँग्रेस सरकार q मजूरांचे पुढारी यांच्यामध्ये जी धुमश्चक्री चालू झाली आहे ती सर्व लोकांना माहीत आहे. या लढ्यात कामगार लोक हे मजूर पुढाऱ्यांच्या मागे आहेत व त्यांना हा संपाचा कायदा नापसंत आहे, ही गोष्ट जगजाहीर झाली आहे. तथापि काँग्रेसचे लोक 'हे बील मजूरांना मान्य आहे' असे खोटेच सांगत सुटले आहेत.
सभेतील लोकसमुदायावरून जर या गोष्टीचा निकाल द्यावयाचा असेल तर मजूरांना हा कायदा नको ही गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी आता लख्ख झाली आहे. आतापर्यंत झालेल्या मजूरांच्या सभा वीस-वीस, तीस-तीस हजारांच्या झाल्या. उलट पाचपन्नास माणसांची देखील सभा काँग्रेसच्या लोकांना मुंबईसारख्या बकाली शहरात भरविता येऊ नये, ही कशाची साक्ष आहे ? काँग्रेसच्या बाजूला सरकार, पोलिस, पैसा, मुंबईचे दादा लोक इतकी सर्व संग्रामाची सामुग्री हाती असताना मूठभरशा मजूर पुढाऱ्यांशी त्यांना तोंड देता येऊ नये हे कशाचे द्योतक आहे ?
या बिलाच्या बाबतीत काँग्रेसची बाजू न्याय्य असती, मजबूत असती तर काँग्रेसच्या लोकांची अशी धुळधाण झाली नसती ! अशी त्यांना माती खावी लागली नसती. या एकाच गोष्टीवरून हा कायदा किती वाईट व मजूरांच्या हिताला किती विघातक आहे, हे मजूरांना सर्वस्वी पटले आहे, असे सिद्ध होत आहे. ' परंतु या बिलाविरुद्ध असलेला विरोध लोक निदर्शनास आणण्याकरिता सात तारखेला सर्वत्र मजूरांच्या सभेत निश्चित झाल्याप्रमाणे मजूर लोक संपावर जाणार यात बिलकूल शंका राहिलेली नाही, असे कॉँग्रेसच्या पुढाऱ्यांना दिसून आल्यानंतर त्यांनी मजूरांची दिशाभूल करण्याच्या [उद्देशाने ] [एक ] [पत्रक ] [५-५० ] मजूरांना हाताशी धरून त्यांच्या सह्यांनी प्रसिद्ध केले आहे. त्या पत्रकाने मजूरांचा गैरसमज होण्याचा संभव असल्याकारणाने त्यासंबंधी खुलाशाचे दोन शब्द लिहिणे आवश्यक झाले आहे.
या पत्रकांमधून असा आक्षेप करण्यात आलेला आहे की ' ज्या बिलाला आज मजूरांचे पुढारी एवढा जोराचा विरोध करीत आहेत त्याच बिलातील मुख्य तत्त्वांना त्यांनी आरंभी पाठिंबा दिला. होता, आणि म्हणून त्याला आजचा विरोध हा