लबाड कोण ? काँग्रेस की मजूरांचे पुढारी ! २३७
गया काँग्रेस (१९२२) ठराव १३ वा
ज्याअर्थी या काँग्रेसचे असे मत आहे की त्यांची स्थिती सुधारण्याकरिता, त्यांना त्यांचे न्याय्य हकक मिळवून देण्याकरिता, त्यांची व हिंदी साधनांची पिळवणूक थांबविण्याकरता हिदी कामगार वर्गाची संघटना करणे जरूर आहे; त्याअर्थी ही काँग्रेस असा ठराव करते की ही काँग्रेस ऑ. इं. ट्रेड युनियन काँग्रेस व अनेक किसान सभा ह्यांनी हिंदी कामकरी वर्गास संघटित करण्यासाठी चालू केलेल्या चळवळीचे स्वागत करते व औँ. इं ट्रे. यु. कॉँग्रेसच्या कार्यकारी मंडळात शेतमजूर व औद्योगिक कामगारांची संघटना करण्यास मदत करण्यासाठी खालील गृहस्थांची कमेटी नेमते. ह्या कमेटीत अधिक गृहस्थ कमेटीस घेण्यास अधिकार आहे.
शी Pe
(२) जे. एन. सेनगुप्त
(३) एस्. एन्. हलधर (४) स्वामी दीनानाथ
(५) डॉ. डी. डी. साठ्ये (६) एस. सिंगारावेलू चेटियार
या ठरावातील मजूरांच्या चळवळीसंबंधाने काँग्रेसने घेतलेली भूमिका आणि या बिलात सामील केलेली तत्त्वे यांच्यामध्ये केवढे जमीन आस्मानचे अंतर आहे, हे कोणाही वाचकास सहज कळण्यासारखे आहे. या ठरावात चालू बिलात असलेल्या अनिष्ट तत्त्वांची पडछाया देखील दिसून येत नाही. कॉग्रेसच्या ठरावामध्ये मजुरांची चळवळ स्वतंत्र असावी त्यांचे रक्तशोषण कोणीही करू नये, असे उघडपणे म्हटले आहे. तीच काँग्रेस आजच्या या बिलाने मजुरांना गुलाम करण्याचे अधम कार्य करीत आहे. नुसते ठराव करूनच काँग्रेसचे लोक राहिलेले नव्हते त्यांनी मजुरांच्या संपात भाग घेतला होता. इतकेच नव्हे तर मजुरांना संप करावयास प्रोत्साहन दिल्याचे अनेक दाखले पटवून देता येतील. खुद्द गांधींनी टिकवून धरण्याचे उपदेश अनेक वेळा केले आहेत, ही गोष्टही सिद्ध करून देता येईल अशी जेथे परिस्थिती आहे तेथे लबाड कोण, हा प्रश्न साहजिकच उद्भवतो. काँग्रेस लबाड की ट्रेड युनियन कॉंग्रेसमधील पुढारी लबाड ? आणि केवळ विसंगततेमुळे जर ट्रेड युनियन काँग्रेसमधील पुढाऱ्यांना लबाड म्हणावयाचे तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना लबाड का म्हणू नये ? ट्रे. यु. काँग्रेसमधील कामगार पुढाऱ्यांपेक्षा काँग्रेसचे लोक जास्त लबाड आहेत, त्यांनी मजुरांना फसविले आहे, असे निदान आमचे तरी मत आहे.
स्वराज्य मिळविण्याकरिता मजुरांच्या पाठिंब्याची त्यांना आवश्यकता होती. म्हणून त्यांनी २०-२२ साली काँग्रेसच्या अधिवेशनामधून वर नमूद केलेले
वाय ६४१ - १८