लबाड कोण ? काँग्रेस की मजुरांचे पुढारी री! - Page 280

२३८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

ठराव पास केले आणि सत्ता हाती आल्याबरोबर त्याच मजूरांना गर्तेत लोटून दिले. अशा लोकांना फसवे म्हणू नये तर काय म्हणावे, हेच आम्हाला समजत नाही. कामगार लोकांना आम्हाला इतकेच सांगावयाचे आहे की त्यांनी प्रामाणिक कोण व अप्रामाणिक कोण याचा शोध लावीत बसण्याऐवजी बिल त्यांच्या हिताचे आहे किंवा अहिताचे आहे याचा प्रामुख्याने विचार करावा आणि एवढ्याच दृष्टीने जर ते या बिलाकडे पाहतील व त्याची छाननी करतील तर आमची खात्री आहे की या बिलाचा निषेध करणे आवश्यक असून त्याचा निषेध करण्याकरिता ठरल्याप्रमाणे ७ नोव्हेंबर रोजी एक दिवसाचा संप घडवून आणणे हाच एक हिताचा व स्वाभिमानाचा मार्ग आहे, असे त्यांना वाटेल, अशी आमची खात्री आहे.

अग्रलेख : जनता, ता. ५ नोव्हेंबर, १९३८, अग्रलेखाच्या शेवटी B. R.A. अशी अक्षरे आहेत.

उद्धृत : गांजरे, खंड ४ पृ. ३२-३७.