सर सयाजीराव गायकवाड राष्ट्रीय वृत्तीचे देशभक्त - Page 281

८३
सर सयाजीराव गायकवाड : राष्ट्रीय वृत्तीचे देशभक्त

” सर सयाजीराव महाराज हे दीर्घ आजारानंतर सोमवारी ६ फेबुवारी १९३९ रोजी रात्री मुंबईतील त्यांच्याजयमहाल पॅलेसमध्ये दिवंगत झाले, त्यांच्या मृत्यूची बातमी जगातील प्रमुख पत्रांनी प्रसिद्ध केली व त्यांच्यावर गुणगौरवपर मृत्युलेख लिहिले. कारण ते प्रबुद्ध, शीलवंत, पुरोगामी आणि प्रजाहिततत्पर राजे म्हणून सर्वत्र ओळखले जात होते. त्यांनी जी जी माणसे विद्यार्जनासाठी व राज्यकारभारासाठी निवडली ती ती जगात कीर्तीवंत झाली. बाबासाहेबांना त्यांनी १९१३ सालच्या मार्चमध्ये परदेशी शिक्षण घेण्यास निवडले व बाबासाहेब जुलैमध्ये अमेरिकेला उच्च विद्यार्जनासाठी गेले. त्यांनी १९१३ ते १९१७ च्या दरम्यान इतका उत्तम अभ्यास केला की त्यांच्या शिक्षकांनी त्यांची पाठ थोपटली. या काळात त्यांनी तीन ग्रंथही लिहिले. बाबासाहेबांची ही अचाट कर्तबगारी पाहून महाराज त्यांच्यावर फार खुष झाले. महाराजांनी आपल्या जीवनास कसे बाळसेदार वळण लावले याबद्दल बाबासाहेब खाजगी बैठकीतून महाराजांच्याबद्दल कृतज्ञतापूर्वक गौरवपर उद्गार काढीत असत. महाराजांचा मी कसा उतराई होईन, याबद्दलही ते योजना सांगत असत." *

'मुंबई, ता. ७ डॉ. आंबेडकर यांना श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांच्या निधनाची दुःखद वार्ता कळताच त्यांनी वर्तमानपत्राच्या प्रतिनिधीजवळ पुढील उद्गार काढले. ते म्हणाले, ' श्री. सयाजीराव महाराजांचे निधन ही माझी वैयक्तिक व फार मोठी हानी झाली आहे. त्यांचे उपकार मी केव्हाही विसरणार नाही. मला त्यांनी जे शिक्षण दिले त्यामुळे आजची योग्यता मला प्राप्त झाली. अस्पृश्य जातीवर त्यांचे फार मोठे उपकार झाले आहेत. त्यांच्याइतके अस्पृश्य जातीसाठी दुसऱ्या कोणीही कार्य केले नाही. ते मोठे समाजसुधारक होते व बडोदे संस्थानात सामाजिक सुधारणांविषयी जे कायदे करण्यात आले ते युरोप वा अमेरिकेतील कोणत्याही सुधारलेल्या राष्ट्राच्या तद्विषयक कायद्यापेक्षा पुढारलेले होते. त्यांनी सर्व सामाजिक घाणेरड्या चालींचा अभ्यास करून त्यातील दोष काढून टाकण्यात पुढाकार घेतला. स्वतःच्या प्रजेच्या

+पाहा, परिशिष्ट क्रमांक-१४.

१ : खैरमोडे खंड ४, पृ. १०२