२४० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
कल्याणासाठी इतके सतत प्रयत्न दुसऱ्या कोणत्याही संस्थानिकांनी केले नाहीत. ते राष्ट्रीय वृत्तीचे असून देशभक्त होते. हा सद्गुण संस्थानिकात क्वचितच दिसून येतो. कित्येक बाबतीत त्यांनी ब्रिटिशांना उदाहरण घालून दिले व ते त्यांच्या हुकमतीखाली कधीच गेले नाहीत. त्यांच्यात वितुष्ट आणण्याचा प्रयत्न करण्यात आला, ही गोष्ट दुःखाची आहे. ते महाराष्ट्रीय असले तरी आपल्या गुजराथी प्रजाजनांच्या विरुद्ध पक्षपात त्यांनी केला नाही, ही गोष्ट त्यांना ओळखणारे सर्व लोक मान्य करतील. माझ्या माहितीप्रमाणे असे अशुद्ध विचार त्यांच्या मनात येणे शक्यच नव्हते.
'सयाजीराव महाराजांच्या मृत्यूने हिंदुस्थानातील एक फार मोठा मनुष्य नाहीसा झाला व बडोदे संस्थान फार मोठ्या राज्यकर्त्याला मुकले. महाराष्ट्रातील एक विभुती नाहीशी झाली. सामाजिक सुधारणांचा पुढारी नाहीसा झाला. अस्पृश्यांचा एकमेव कैवारी गेला, संस्थानिकांतील द्रष्टा गमावला."
७8७6
* : जनता, ११ फेब्रुवारी १९३९.