स्वतंत्र मजूर पक्षाचे युद्धविषयक धोरण ना वबा - Page 283

८४

स्वतंत्र मजूर पक्षाचे युद्धविषयक धोरण

स्वतंत्र मजूर पक्षाच्या कार्यकारी मंडळाने त्या पक्षाच्या अध्यक्षास आपले युद्धविषयक धोरण जाहीर करण्याचा अधिकार दिला आहे. यापुढे दिलेल्या धोरणावरून वरील पक्षाची चालू युरोपियन युद्धासंबंधी मनोवृत्ती काय आहे हे*

युद्धास सुरवात* हिंदी पुढाऱ्यांच्या युद्धविषयक* प्रवाह वाहू लागला आहे. हिंदुस्थानने ग्रेट बिटनला या युद्धात मदत करावी असा या धोरणाचा सूर प्रामुख्येकरून वाहात आहे तरी त्यातून फारसा उत्साह मात्र कोठेही व्यक्‍त होत नाही. उलटपक्षी असे म्हणता येईल की या व्यक्‍त झालेल्या धोरणावरून ब्रिटनशी सहकार्य करण्याबाबत निश्चयाभाव व अनिच्छा हीच दृग्गोचर होत आहेत. ब्रिटनला मदत करावयाची तर कोमटपणा व मैत्रीचा अभावही असता कामा नयेत, हे उघड आहे. सोमळ (सीमित ?) लोकांचे हिंदुस्थानच्या रक्षणापुरते मर्यादित सहकार्य व विरोधकांच्या निष्क्रीय. विरोधामुळे उत्पन्न होणारी विघ्ने ही परस्परास मारक होऊन ब्रिटनला द्यावयाची मदत स्थगित झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सर्व हिंदी जनतेचा पाठिंबा मिळविण्याची व्यवस्था करावयास हवी. असे करणे झाल्यास लोकांमध्ये अनुत्साह कोणत्या कारणांनी उत्पन्न झाला आहे तेच प्रथमत: पाहिले पाहिजे. स्वतंत्र मजूर पक्षाच्या दृष्टीने या कारणांचे पृथःकरण केल्यास या निरुत्साहतेचे खरे कारण इंग्लंड व फ्रान्स या देशांच्या पूर्वाजितामध्येच आढळून येते. जर्मन अन्यायाचा प्रतिकार या दोन देशांनी गोगलगाईच्या वेगाने आजवर केला आहे. जर्मनीच्या पहिल्याच अन्यायाचा सहकार्याने प्रतिकार न करता त्यांनी जर्मनीस एकामागून एक अन्याय करण्यास मोकळीक दिली ; व झेकास्लोव्हाकियाचे रक्षण करणे हे त्यांचे पवित्र कर्तव्य असताही त्यांनी त्या देशाचा बळी SHA जर्मनीची आराधना करण्याचा अश्लाध्य प्रयत्नही केला. हिटलरला आजवर पाच खून माफ केले | पोलंडवरील चढाई हे त्याचे सहावे पातक आहे. आता हिटलरला, विरोध करण्यास सरसावलेल्या राष्ट्रांनी यापूर्वीच असा विरोध करावयास हवा होता, असे स्वतंत्र मजूर पक्षाचे स्पष्ट मत आहे. लहान राष्ट्रांचे जर्मनीला बळी देऊन आजवर संपादन केलेल्या शांततेमुळेच चालू लढाईसाठी सहकार्य मागण्याचा नैतिक अधिकार संपुष्टात आला आहे.

*उपलब्ध स्त्रोतामध्ये काही शब्द अस्पष्ट असल्यामुळे देता आले नाही.--संपादक.