२४२ डॉ. बाघासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
लढाईनंतर न्यायाला धरून तह करण्यासाठी लढाया लढल्या जात नाही, असे स्वतंत्र मजूर पक्षाचे मत आहे. शांततेनंतर तहाच्या अटी मोडल्या जाणार नाहीत, अशी काळजीही जेती राष्ट्रे घेत नाहीत. निव्वळ सहकारी-सुरक्षिततेने कार्यभाग होणार नाही. सन १९१४ मध्ये असले सहकार्य होते. अनेक राष्ट्रे एक होऊन त्यांनी जर्मनीचा पाडाव केला. पण पाडाव झालेल्या जर्मनीचे पुनरुत्थान होऊन तो आज जगाच्या छातीवर नाचत आहे. यावरून अन्याय करणाऱ्याचा पराभव केल्याने कार्यभाग होईल, असे मानणे फोल ठरते.*
(१) युद्धात जय मिळाल्यानंतर तह करणे तो न्यायाच्या तत्त्वास धरूनच करावयास हवा.
(2) युद्धाप्रमाणेच तहाच्या बाबतीतही राष्ट्रानी सहकार्य करावयास हवे.
(३) तहाचा भंग झाला की भंग करणारास शिक्षा व्हावयास हवी. याबाबतीत भंग करणारा कोण, अन्याय कोणास झाला, या गोष्टी जवळच्या देशात घडल्या का दूरच्या देशात घडल्या, याचा विचार न करता अन्यायाचा प्रतिकार केव्हाही कोठेही झालाच पाहिजे. अशी काळजी घेतल्याशिवाय युद्ध प्रवृत्तीचा बीमोड होणे नाही. स्वतंत्र मजूर पक्षाला या गोष्टीचे अत्यंत महत्त्व वाटत असून चालू युद्धात भाग घेणाऱ्या सहकारी राष्ट्रांनी एक. प्रातिनिधिक मंडळ नेमून आपल्या तहाच्या अटी आगाऊच जगजाहीर कराव्या, असे या पक्षाचे मत आहे. अशी घोषणा केल्यानेच लोकशाही राष्ट्रांच्या मागण्यांचा रास्तपणा जगास पटेल व न्यायाच्या तत्त्वांना धरून शांतता प्रस्थापित करणे व ती टिकवणे हेच लोकशाही राष्ट्रांचे ध्येय आहे, अशी सर्वांची खात्री होईल. अशी घोषणा केली तरच चालू युद्ध हे युद्धाचा बीमोड करण्यासाठी केलेले युद्ध आहे, असे म्हणता येईल ; व मग अशा युद्धात भाग घेण्यास कोणाही विचारवंतास आळेटाळे करण्याचे कारण उरणार नाही.
ब्रिटनला मदत करण्यांस कांकू करण्याचे आणखीही एक कारण आहे, असे स्वतंत्र मजूर पक्षाचे मत आहे. हिंदुस्थान देश आज ब्रिटीश मंत्रीमंडळाच्या जगन्नाथ रथाला बांधला जाऊन त्या रथाबरोबर तो फरफटत जात आहे. इंग्रज मुत्सद्यांना आंतरराष्ट्रीय धोरण ठरविण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असून त्यांना हवी तशी देवाणघेवाण करण्याची मुभा आहे. लढाई पुकारणे न पुकारणे, तह करणे न करणे ही त्यांच्या मर्जीची गोष्ट आहे. या आंतरराष्ट्रीय राजकारणात हिंदुस्थानला कोणी विचारीत नाही. लढाई करणे, तह करणे याबाबत
“अस्पष्ट.