स्वतंत्र मजूर पक्षाचे युद्धविषयक धोरण २४३
हिंदुस्थानचा विचार कोणी घेत नाही, आंतरराष्ट्रीय राजकारण यशस्वी झालं तर हिंदुस्थानचा काही फायदा नाही, पण ते फसले व लढाईचा प्रसंग आला की हिंदुस्थानने पैसा व मनुष्यबल पुरविलेच पाहिजे ! ही परिस्थिती हिंदुस्थानच्या दृष्टीने अन्यायाची आहे, हे कोणीही कबूल करील. व्हर्सायच्या तहावर हिंदुस्थानच्या प्रतिनिधींनी सह्या केल्या होत्या ही गोष्ट खरी आहे. पण तह करण्याच्या बाबतीत 'विचार न घेता निव्वळ ' सह्याजीराव ' होण्याने कोणाचेही समाधान होण्याजोे नाही. आंतरराष्ट्रीय राजकारणात हिंदुस्थानास मताचा अधिकार असणे ही गोष्ट साम्राज्यातील इतर देशांना मताचा अधिकार असण्यापेक्षाही अधिक अगत्याची आहे. साम्राज्यातील वसाहतींना योग्य त्या कारणास्तव तटस्थ राहण्याचा हक्क आहे. तसा हिंदुस्थानास नाही. युद्धात भाग घेणे हिंदुस्थानच्या मर्जीवर अवलंबून नाही. म्हणूनच युद्धापुर्वी या देशाचा विचार घेणे अगत्याचे आहे. पण ही अगत्याची गोष्ट आजवर कधीही करण्यात आलेली नाही.
` युद्धप्रसंगी अळंटळं करण्याच्या सर्व कारणांचा स्वतंत्र्य मजूर पक्षाने विचार केला आहे. ही कारणे बरीच संयुक्तिक आहेत ही गोष्टही कोणास नाकबूल करता यावयाची नाही. निव्वळ पोलंडचे संरक्षण करणे हाच काय तो युद्धाचा हेतू असता तरी वरील कारणास अधिक बळकटी आली असती. चालू युद्धात पोलंडच्या बाजूला न्यायाचे पारडे झुकत आहे, असे स्वतंत्र मजूर पक्षाचे मत नाही. पोलंडने केव्हाच लोकशाहीचे श्राद्ध उरकून टाकलेले आहे. ज्यू लोकावर पोलंडने जर्मनीपेक्षा कमी अन्याय केलेले नाहीत. चालू भीषण परिस्थितीत पोलंडने रशियाची:मदत घेऊन जगण्यापेक्षा मरणच बरे, असे धोरण ठेवले आहे. चालू युद्ध निव्वळ पोलंडच्या रक्षणासाठी पुकारलेले नाही, असे स्वतंत्र मजूर पक्षाचे मत आहे. पोलंडचे रक्षण हा युद्धाच्या हेतूपैकी एक कार्यभाग आहे इतकेच. पोलंड व जर्मनी यांच्या युद्धाच्या मुळाशी एक व्यापक व गंभीर प्रश्न आहे, हे कोणासही नाकबूल करता यावयाचे नाही. जगातील अनेक राष्ट्रांपैकी एक राष्ट्र म्हणून राहण्यास जर्मनी कबूल नाही. जर्मनीला आपण उच्च दर्जाचे राष्ट्र आहो ही गोष्ट जगाला पटवून द्यावयाची आहे. आपले म्हणणे इतर राष्ट्रांनी मान्य केलेच पाहिजे, असा जर्मनीचा आग्रह आहे व असे न केल्यास जबरदस्तीने आपण आपले म्हणणे मान्य करावयास इतरास भाग पाडू असे चालू युद्धाने जगास जर्मनीने आव्हान दिलेले आहे. हे आव्हान निव्वळ पोलंडला दिलेले नसून सर्व जगासच दिलेले आहे. अशा स्थितीस सर्व राष्ट्रास समानतेचे इक्क आहेत असे मानणाऱ्या राष्ट्रांनी जगाच्या संस्कृतीत आपणासही भर टाकता यावी म्हणून सहकार्य करून जर्मनीच्या शिरजोरीला आळा घालणे हेच त्यांचे