स्वतंत्र मजूर पक्षाचे युद्धविषयक धोरण ना वबा - Page 286

२४४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

कर्तव्य आहे. जर्मनीची माजोरीची मागणी हा जगाचा उपमर्द आहे. हिंदुस्थानला तर ही शिरजोरी सर्वथैव तिरस्करणीय वाटत आहे. हिन्दुस्थानच्या इच्छा व महत्वाकांक्षा यांना जर्मनीच्या शिरजोरीच्या मागणीने मूठमाती मिळणार आहे. हिन्दुस्थानला स्वराज्य हवे असून कीतीही संकटे आली तरी ते मिळविण्याचा व मिळाल्यावर टिकविण्याचा हिन्दुस्थानचा निर्धार आहे. नॉर्डीक वंशाच्या लोकांनीच जगाचे राज्य करावे व इतर लोकांनी त्या लोकांच्या अंकीत राहाटे असे जर्मनीचे म्हणणे असल्याने जर्मनीचे धोरण म्हणजे जगातील इतर सर्द लोकांना आव्हानच होय. अशा स्थितीत जर्मनीचे. हे आव्हान स्वीकारून आपल्या स्वातंत्र्याच्या ध्येयासाठी झगडून आपला हक्क शाबीत करण्याशिवाय हिन्दुस्थानला गत्यंतर नाही. स्वतंत्र मजूर पक्षाची अशी भूमिका असल्यामुळे हिन्दुस्थानच्या रक्षणासाठी हिन्दी लोकांनी ब्रिटनला पूर्ण पाठिंबा दिला पाहिजे पसे या पक्षाचे सांगणे आहे.

इतर पक्षांचे लोकही ब्रिटनला युद्धात मदत करण्याच्या कामी टाळाटाळ करीत आहेत, ही गोष्ट स्वतंत्र मजूर पक्षाला माहीत आहे. इंतर पक्षांचे हे धोरण तत्त्वावर आधारलेले नसून ते डावपेचासाठी स्वीकारण्यात.येत आहे. इंग्लंडची आपत्ती हीच हिंदुस्थानची संधी असे त्यांना वाटते. मुस्लीम लीग व हिन्दुसभा या इंग्लंडच्या आपत्तीचा फायदा घेऊन आपल्या पारड्यात जादा हक्क पाडून घेऊन जातिनिवाडा आपआपल्या दृष्टीने दुरुस्त करू पहात आहेत. या जातिनिविष्ट धोरणाचा विचार करण्याची येथे जरूरी नाही. इंग्लंडची गरज ही हिन्दुस्थानच्यां स्वातंत्र्याची संधी होय असे तिसऱ्या एका महत्वाच्या पक्षाचेही मत आहे. हे समजणे कठीण आहे. हिन्दुस्थानला आपल्या शक्तीच्या जोरावर आपणास हवे ते मागण्याची ही संधी आहे, असे त्या पक्षाचे म्हणणे असल्यासही हिन्दुस्थानची संधी पोकळ आहे. त्यात काही राम नाही असेच कोणासही कबूल करावे लागेल. गांधींचा सत्याग्रहाचा दमछाकीचा मार्ग असून तो पुन्हा हाताळण्याचा कोणाचाही मानस नाही. इंग्लंडच्या एखाद्या शत्रूस पाचारण करून हिंन्दुस्थानची गुलामगिरीतून मुक्तता करण्याची ही संधी आहे, असे म्हणणे हे आपणास जाळ्यात अडकवून घेण्यासारखे आहे. बोलावून आणलेला पाहुणा घरधनी होण्याचा संभव असल्याने, भावनावश न झालेल्या कोणाही विचारी इसमास असे करणे शहाणपणाचे वाटणार नाही. जवळच्या भविष्य काळाकडे नजर टाकल्यास, हवेत त्रिशंकूप्रमाणे तरंगत राहण्याची इच्छा नसणाऱ्या कोणासही, हिंदुस्थानने ब्रिटीश साम्राज्यातच राहून ब्रिटनपासून समानतेचे हक्क प्राप्त करून घेण्याचे प्रयत्न करावे, असेच वाटणार, असा स्वतंत्र मजूर पक्षाचा विश्वास आहे. आजपर्यंत हिन्दुस्थानने बराच प्रवास करून या स्वातंत्र्याच्या . मार्गावर मोठा पल्ला गाठलेला आहे