स्वतंत्र मजूर पक्षाचे युद्धाविषयक धोरण २४५
उरलेला मार्ग थोडा असून तो आक्रमणणे ही हिन्दुस्थानच्या आटोक्यातले आहे. स्वातंत्र्यासाठी हिन्दुस्थानच्या परक्या मित्रास पाचारण करणे हे आत्मघातकी ठरले नाही तरी हातचे सोडून पळत्याच्या मागे लागण्यासारखे मूर्खपणाचे खास ठरणार. नव्या धन्याच्या हुकमतीत हिन्दुस्थानचे काय होणार हे कोणासही सांगता येणे शक्य नाही. या सङट्टेबाजीच्या अनिश्चित धोरणाचा त्याने सर्वनाश होणार असला तरी हिन्दी लोकांनी अंगीकार करावा, असे कोणताही शाबूत डोक्याचा माणूस सांगू शकणार नाही.
हिंदुस्थानच्या लोकांनी आपल्या हितार्थ चालू युद्धात ब्रिटनशी सहकार्य करणे अगत्याचे आहे. ब्रिटननेही हिंदुस्थानसंबंधी करावयाची आपली कर्तव्ये ओळखून ती यापुढे दिरंगाई न करता पार पाडली पाहिजेत.
हिंदुस्थानच्या लोकास आपल्या देशाचे संरक्षण करण्यास तयार करणे हे ब्रिटनचे पहिले कर्तव्य होय. हिंदुस्थानवर सर्व बाजूंनी हल्ला करता येण्यासारखा आहे. असे असूनसुद्धा आज हिंदुस्थानइतका संरक्षणरहित असा दुसरा कोणताही देश नाही. जमीन, समुद्र व हवा या तिन्हीपैकी कोणत्याही मार्गने हिंदुस्थानवर आक्रमण झाल्यास त्याजपाशी स्वत:च्या हिंमतीवर प्रतिकार करण्याचे साधन उपलब्ध नाही. संरक्षणासाठी मुख्यत्वेकरून आज हा देश ब्रिटीश सैन्य, ब्रिटीश आरमार व ब्रिटीश विमाने यावरच अवलंबून आहे. राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये हिंदुस्थानच्या संरक्षणाची जबाबदारी हिंदुस्थानवर सोपविण्याचे ठरले होते. पण आजतागायत हे तत्व अमलात आणण्यासाठी उपाय योजना करण्यात आलेली नाही. लष्करी शाळा व लष्करातील अधिकाराच्या जागा देणे याबाबत बरीच वाच्यता करण्यात येतं आहे. हिंदी लोकांना देशाच्या संरक्षणासाठी तयार करण्याच्या मानाने पाहता वरील दोन्ही गोष्टी गौण आहेत, असे स्वतंत्र मजूर पक्षाचे मत आहे. अमुक एका वयावर सर्व हिंदी लोकांना जात, वर्ग, धर्म वगैरे गोष्टीचा विचार न करता सक्तीचे लष्करी शिक्षण देणे ही अत्यंत महत्वाची गोष्ट होय. हे धोरण स्वीकारल्यानेच हिंदुस्थानच्या संरक्षणाचा प्रश्न सुटणार आहे. हिंदुस्थानची मानवी शक्ती अपरिमित आहे. या शक्तीची जोपासना केली तर हिंदुस्थानच्या संरक्षणाचा प्रश्न सुटेल असे नाही तर अखिल ब्रिटिश साम्राज्यावर केवढाही बलाढ्य शत्रू आला तरी त्याचा बंदोबस्त करणे शक्य होईल. अशी परिस्थिती असतांनाही ब्रिटीश सरकारने हिंदी लोकास लष्करी शिक्षण न देणे ही आश्चर्याची गोष्ट होय. लढाईपुरते हिंदी लोकांना सरकारने युद्धास बोलावून लढाई संपल्याबरोबर त्यांना युद्धास नालायक म्हणून सोडून देणे, ही आश्चर्य करण्याजोगी गोष्ट नाही काय ? ब्रिटिश सरकार हिंदी लोकांना युद्धकाळी व युद्धानंतर युद्धक्षम करण्यास का तयार नाही, असा प्रश्न सर्व बाजूनी विचारण्यात येत असतो. हिंदी लोकांवर ब्रिटिशांचा विश्वास नाही म्हणून ते