८५
अस्पृश्यतेची कुळकथा
'“ हिंदुस्थानातील लोकांनी शेतीस नुकतीच कोठे सुरवात केली होती. अशा प्राचीन काळापासून आपण या अस्पृश्यतेच्या कुळकथेचा विचार करावयास हवा. फार प्राचीनकाळी स्थानबद्ध शेतकऱ्याप्रमाणे गुरेढोरे बाळगून त्यांना चारापाणी मिळेल अशा ठिकाणी इतस्तत: भटकत राहणारे धनगर वृत्तीचे लोकही असत ही गोष्ट आपण प्रथमत: लक्षात घेतली पाहिजे. या धनगर वृत्तीच्या लोकांत चारापाण्यासाठी नेहमी लढाया चालू रहात असत व त्यांना अनेक प्रसंगी स्थानबद्ध झालेल्या शेतकरी वर्गाशीही झुंजावे लागत असे हे उघड आहे. या नित्य चालू असलेल्या लढ्यामुळे या भटक्या धनगर वृत्तीच्या जमातीपैकी काही नाश पावत असत, या पसरलेल्या लोकांना वाहतुकीची साधने त्याकाळी उपलब्ध नसल्यामुळे, संघटित होणे कठीण जात असे हे सांगणे नकोच अशा स्थितीत त्यांनी काय करावे हा प्रश्नच होता.
वर सांगितल्याप्रमाणे त्याकाळी पुष्कळ लोक शेतकरी होऊन स्थानबद्ध झालेले होतेच. या लोकांना आपली शेतवाढी, छरे दारे, पीकपाणी व उच्च संस्कृति यांना
या भटक्या लोकांकडून उपसर्गे होऊन शांतता भंग होऊ नये अशी तीव्र इच्छा
वाटत असे. पण या भटक्या सडेसोट फाटक लोकांशी तोंड देण्याचे सामर्थ्य मात्र त्या लोकांत नसे हे सांगणे नकोच.
या भटक्यांच्या उपद्रवापासून आपल्या मालमत्तेचे संरक्षण करण्याच्या हेतुने त्याकाळच्या शेतकरीवर्गाने या भटक्यापैकीच आपसांतील लढायामुळे, जर्जर व विस्कळीत झालेल्या लोकांची गांवरक्षक म्हणून योजना केली व त्यांना गावाबाहेर जमिनी देऊन त्यांजकडे शांतता राखून सुव्यवस्था राखण्याचे काम सोपविण्यात आले.
या रक्षकांनी खेड्याचे रक्षण करण्याचे आपले कर्तव्य पिढ्यानुपिढ्या बजावले आहे. त्या कालांत खेड्यांच्या सीमेवर राहणारे हे संरक्षक व खेड्यांतील शेतकरी यांच्यामध्ये सलोख्याचे व माणुसकीचे संबंध असून त्याकाळी अस्पृश्यतेची कल्पना कोणासही नव्हती. तर मग य़ा अस्पृष्यतेचा जन्म कसा झाला.