बाबासाहेबांच्या लेखांची शीर्षके पाहिली की, त्यांच्या सर्वस्पर्शी बुद्धिवैभवाची प्रचिती येते. भारतातील हिंदू धर्म व या धर्माचे विषमतावादी तत्त्वज्ञान हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख लक्ष्य आहे. या धर्मातील जातीयता, विषमताग्रस्तता व अस्पृश्यता यांसारखे ज्वलंत प्रश्न त्यांच्या चिंतनाचे विषय आहेत. ते अस्पृश्यतेची कुळकथा विस्तारपूर्वक मांडतात. समाजसमतेच्या विरोधकांची परंपरावादी विचारसरणी स्पष्ट करतात. अस्पुश्यवर्गाला गुलाम करणाऱ्या महार वतनाची विघातकता विशद करतात. केवळ अस्पृश्यवर्गाचे प्रश्न हाच त्यांच्या चिंतनाचा विषय नाही. समस्त भारतातील स्त्री-शुद्रातिशाद्र वर्ग व त्यांचे प्रश्नोपप्रश्न त्यांच्या चिंतनाचे विषय आहेत. या देशातील बहुजन वर्गाच्या शोषणाचे भीषण चित्र ते रेखाटतात. खोती उर्फ शेतकरी वर्गाची गुलामगिरी व त्यामागील पार्श्वभूमी ते विशलेषित करतात. अस्पृश्य वर्गाची कैफियत व्यक्त करताना ते ज्यांचा त्यांचा महारांवर कटाक्ष कशाप्रकारे असतो, हे सप्रमाण स्पष्ट करतात. या देशात शूद्रातिशूद्रांबरोबरच स्त्रियांची अवस्था कशी भयावह आहे, याचे प्रत्ययकारी लेखन बाबासाहेब करतात. “ हिंदू संमाजातील वर्गा-वर्गातील उच्च-नीचि-भेद व लिंगभेद कायम ठेवून कोणतेही सुधारणेचे कायदे करणे म्हणजे घाण न काढता त्यावर उभारलेले पत्त्यांचे बंगले होत, याचे तपशीलवार विश्लेषण ते साकारतात. हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनती या विषयाचा मागोवा घेताना ते या अवनतीस जबाबदार असणाऱ्यांची दांभिकता उलगडून दाखवितात. हिंदुत्ववादी राष्ट्रवादाचा फसवेपणा स्पष्ट करताना फसव्या राष्ट्रवादाच्या भुलथापांनी व पोकळ घोषणांनी कामगार वर्ग फसला जावू नये याची ते दक्षता घेतात. गिरण्याँचे मालक व कामगार यांच्या संबंधाची चर्चा करताना ते कामगारवर्गास हितोपदेश देतात. बाबासाहेबांचे लेखन अस्पृश्य वर्गाची सर्वतोपरी काळजी वाहण्याच्या उद्देशातून आकारास आलेले असल्यामुळे ते हिंदुमहासभा व अस्पृश्यता यासारख्या घटकाचा विचार सावधपणे करतात. या देशातील प्रतिगामी नाझीवादाचे व त्याच्या प्रतिकूल परिणामांचे ते साक्षेपाने विश्लेषण करतात
बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लेखांमधून भारतीय समाजरचनेची, या समाजरचनेतील विविध मतप्रवाहांची, त्यातील विचारभिन्नतेची सखोल चर्चा केली आहे. ते अस्पृश्यांच्या, बहुजनांच्या व स्त्रीवर्गाच्या गुलामगिरीचा, त्यांच्या शोषणाचा सर्वागीण विचार करतात. त्यांचे लेखन शूद्रातिशूद्रांच्या अवनतीचे, कैफियतीचे रेखाटन करून थांबत नाही. स्त्री-शूद्रातिशूद्रांचे प्रश्न किती गंभीर आहेत, हे विशद करून ते त्यावरील उपाययोजना सिद्ध करतात. या युगानुयुगांपासून अनाकलनीय ठरलेल्या प्रश्नांवर ते अचूक उत्तरे शोधून काढतात. या कूटप्रश्नांची ते सर्वांगीण
(पंचवीस)