अस्पृश्यतेची कुळकथा - Page 291

अस्पृश्यतेची कुळकथा २४९

या बुद्धधर्माच्या वाढत्या लाटांपासून, ब्राह्मणीधर्माने आपला बचाव कसा केला. हे पहाण्याजोगें आहे. त्या धर्माने आजपर्यंतचें आपले यज्ञयाग व धार्मिक विधितंत्र झुगारून दिले. गोमांसावर यथेच्छ ताव मारणाऱ्या या ब्राह्मणांनी गाईच्या माना मुरगळण्याचे सोडून बुद्धधर्मावर चढाई करण्याच्या पापी दृष्टीने, गाईला आपली पवित्र गोमाता बनवून सोडले.

अशा रीतीनें मांसभक्षक ब्राह्मण शाकाहारी बनून, सोमरस पिऊन झिंगणाऱ्या ब्राह्मणांचे रूपांतर होऊन, [त्यांनी ] [सुरापानास ] [महापातक ] [ठरविले. ]

क्षत्रियांना बुद्धधर्मापासून परावृत्त करण्यासाठी व त्यांना ब्राह्मणधर्मात डांबून ठेवण्यासाठी ब्राह्मणांनी, त्यांना आपल्या बरोबरीचे हक्क दिले. वैश्यशूद्रांना ब्राह्मणधर्मातून फुटून जातां येऊ नये म्हणून ब्राह्मण व क्षत्रियांनी पोलीस शिपायाप्रमाणे त्यांच्या दोहोंबाजूस राहून, त्यांना आपल्या कळपातच राखले पाहिजे अशा अर्थाची वचने ब्राह्मणी धर्मग्रंथातून आढळतात.

गाईला पवित्र ठरवून व बुद्धधर्माच्या इतर अनेक शिकवणींचा ब्राह्मणी धर्मात अंतर्भाव करून ब्राह्मणांनी यज्ञयागाची आपल्या धर्मातून हकालपट्टी केली व अशारितीने जे असंख्य हिंदुलोक बुद्धधर्मात गेले होते त्यांना पुनरपी आपल्या धर्मात सामील करून घेतले. ब्राह्मणांनी बुद्धाच्या समतेचा स्वीकार करून चातुर्वर्ण्याची चौकट मात्र कधीही नाहीशी केली नाही ही लक्षात घेण्याजोगी गोष्ट आहे. त्यांनी एक गोष्ट केली. क्षत्रियांना आपल्या बरोबरीने हक्क देऊन ब्राह्मणी वैदिक देवता, इंद्र, वरुण, अग्नि वगैरे यांची धूर्तपणे हकालपट्टी केली व त्यांच्या जागी इतर क्षत्रियांना प्रिय असणाऱ्या रामकुष्णादि देवांची स्थापना केली. अशा अनेक तडजोडी करून त्यांनी आपला डाव मोठ्या मुत्सद्देगिरीने साधला.

या तडजोडीच्या चाणक्यपणांतून बुद्ध धर्माला तिटकारा वाटण्याजोगी एक गोष्ट घडून आली. गोयज्ञाची बंदी बुद्धानेच केली होती. गाईला ब्राह्मणांनी पवित्र बनवून सोडले होते. हिंदुंना हा गाईचा पवित्रपणा पटून त्यांनी गोवध बंद केले. आज ज्यांना आपण अस्पृश्य समजतो त्या लोकांनीही गोवध बंद केलेच. परंतु हे अस्पृश्य लोक दारिक्र्यांत असल्याने त्यांना ताजे मास विकत घेणे शक्य होत नसे. त्यांनी आपली मृतमांस भक्षणाची पुरातन चाल मात्र पुढे चालू ठेविली,

बुद्धानी व ब्राह्मणांनी, कोणीही, मृत जनावरांच्या मांस भक्षणाची बंदी केलेली नव्हती. जिवंत गाई मारण्याविरुद्ध दोघांचाही कटाक्ष होता. परंतु आजच्या अस्पृश्य मानलेल्या लोकांनी एक मोठा गुन्हा केला. ARE पीडलेल्या