अस्पृश्यतेची कुळकथा - Page 292

२५० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

समाजाच्या खालच्या थरांतील या लोकांनीं बुद्ध धर्माला फार काळ चिकटून राहण्याचा मोठा भयंकर गुन्हा केला. त्यांना ताळ्यावर आणण्यासाठी वर्षानुवर्ष महाप्रयास करावे लागले. दुसऱ्या कोणत्याही उपायांनी ते ताळ्यावर येत नाहींत असें पाहून त्यांजवर कडक बहिष्कार घालून त्यांना अस्पृश्यतेच्या गर्तेत लोदून देण्यांत आलें.

त्यांचे मृतमांस भक्षण हेंच शस्त्र त्यांजविरुद्ध वापरण्यांत आले. या अभक्ष्य भक्षणाची हिंदुंना साहजिकच शिसारी येई. ब्राह्मणांनी या परिस्थितीचा पुरेपुर फायदा घेऊन कोट्यावधी लोकांना अस्पृश्य म्हणून वाळींत टाकलें. इतर लोकांनी बुद्धधर्म सोडला त्याप्रमाणेंच या लोकांनीही बुद्धधर्म सोडला त्याप्रमाणेंच या लोकांनीही आपली पगडी फिरवली नाही म्हणूनच त्यांना ही जन्मठेपेची, वंशपरंपरागत शिक्षा ठोठावण्यांत आली आहे. अशी या अस्पृश्यतेची कुळकथा असून आजच्या सुशिक्षणाच्या, स्वातंत्र्य ध्येयाच्या व समाज समतेच्या नवयुगांतही ती आज सुखरूपपणे नांदत आहे हें नवल नाहीं काय ? "' °

७७९७

१ जनता, २ मार्च १९४०.