राष्ट्र अजून बनायचेच आहे ! - Page 296

८७

राष्ट्र अजून बनायचेच आहे !

"लीगच्या मुक्तिदिन समारंभानंतर इतर जातींतही राजकीय हक्कासंबंधी धडपड करण्याची प्रवृत्ती उत्पन्न झाली. याबाबतीत विचार विनिमय करण्यासाठी पारशी जातीतील काही लोकांची बैठक डॉ. एफ. के. दादाचांदजी, श्रीं. एन. एच. एहनवाला आणि श्री फिरोजशहा मेहता या तिघांनी प्रेसिडेन्सी असोसिएनच्या कचेरीत घेतली. ती सोमवारी ५-२-१९४० रोजी सांयकाळी झाली. पार्शी जातींतील ३० प्रमुख गृहस्थ बैठकीस बोलविलेले होते. बॅ. वि. दा. सावरकर व डॉ. आंबेडकर यांनाही आमंत्रण असल्यामुळे ते बैठकीस उपरिथत झाले. डॉ. आंबेडकरांनी पार्शी जातीला असा सल्ला दिला की ही जात मुंबईत जास्त आहे. व येथील दैनंदिन घडामोडीत पार्शी लोकांना भाग घेता येईल. तो भाग त्यांनी कोणत्या पक्षातफे घ्यावा हा मुद्दा महत्वाचा नाही, पण त्यांनी गुपचूप न बसता चळवळीत भाग घ्यावा हे महत्वाचे आहे. त्यांनी काँग्रेस विरोधी फळी उभारण्यासाठी अस्पृश्य लोक, मुसलमान, हिंदू महासभावादी हिंदू वगैरे जमातींची एकजूट केली तर काँग्रेस व तिचा विरोधी पक्ष ही फळी, असे चित्र देशात दिसेल; राजकीय दृष्टीने हे इष्ट आहे. विरोधी पक्षाला इंग्लंडमध्ये महत्त्व आहे. तशी हिंदुस्थानात परिस्थिती नाही. ती उत्पन्न करणे जरूर आहे.

पार्शाना अस्पृश्यादी जातींकडून मतदान भरपूर पडेल व त्यांचे उमेदवार निवडून येतील, असा बाबासाहेबांच्या भाषणाचा व त्यांना विचारलेल्या प्रश्‍नांना दिलेल्या उत्तरांचा सारांश होता.

बॅ. सावरकर यांनी पाशनि सल्ला दिला की, तुम्ही मुस्लीम लीगशी सहकार्य न करता हिंदू महासभेशी सहकार्य करा. त्यात तुमचे हित आहे. (“Strong Opposition To Congress—Move in Bombay Province— Parsis Advised To Work With Hindu Mahasabha.”— The Times of India. Tuesday, 6-2-40, p.-7)

काँग्रेस व लीग यांचे भारतीय स्वातंत्र्याबद्दलचे जे दृष्टीकोन आहेत, त्याबद्दल डॉ. आंबेडकर याचे विचार आजमाविण्यासाठी टाईम्सच्या प्रतिधिनीने त्यांची सोमवारी ५-२-१९४० रोजी Wal मुलाखत घेतली. भारत हे एक राष्ट्र आहे, हे