राष्ट्र अजून बनायचेच आहे ! - Page 297

राष्ट्र अजून बनायचेच आहे ! २५५

काँग्रेस व गांधीजी यांचे मत मला मान्य नाही, तसेच हिंदू व मुसलमान यांची दिलजमाई होणे शक्य नाही, हे लीगचे मतही मला मान्य नाही. आजच्या स्थितीत आपण राष्ट्र या स्थितीत नाही. परंतु दोन्ही समाजात ऐक्य साधण्याच्या हेतूने जर योग्य अशा काहीं सामाजिक पुनर्रचना हिंदू व मुसलमान या दोन्ही समाजात करण्यात आल्या तर आपण राष्ट्र या पदवीला पोहोचू शकू, असा माझा विश्वास आहे, असा बाबासाहेबांच्या मुलाखतीतील भाषणाचा सारांश होता. Discussing the Congress and Muslim League viewpoints with a representation of their paper on Monday night, Dr. B. R. Ambedkar, Leader of the Independent Labour Party, said, “I do not agree with Mr. Gandhi and the Congress when they say that India is anation. I do not agree either with the foreign relations committee of the Muslim League when they say that Hindus and Muslims could not be welded together into a nation.

“My belief is” he continued “that we are not a nation. But my confident hope is that we can be a nation provided proper processes of social amalgamation are set forth’—The Times of India,

Tuesday, 6-2-1940 p-11). या वृत्तांताची माहिती 'आशा, प्रमोद'ने

दिली ती अशी"

"मला वाटते--हिंदू समाज राष्ट्र नाही. मुस्लीम समाज राष्ट्र नाही. हिंदु-मुस्लीम समाज हेही राष्ट्र नव्हें. राष्ट्र अजून बनायचेच आहे. हिंदु समाजाला पाहिजे असेल तर निराळे राष्ट्र बनविता येईल. मुसलमान लोकांना स्वतःचे राष्ट्र बनवावयाचे असेल तर त्यांनाही निराळे राष्ट्र बनविता येईल. दोघांचं मिळून जर एक राष्ट्र करावयाचं असेल तर तसेही एक राष्ट्र करतां येईल. राष्ट्र ही काही उपजत वस्तु नव्हे. ही घडीव आहे. घडवणाऱ्याची इच्छा असेल तर ते घडवितां येईल. नुसत्या एकत्र मतदार संघानी एवढं होणार नाही. पांच वर्षाच्या अवधींत जे लोक एकमेकांचा तिरस्कार करतात, एकमेकाशीं फटकून

* खैरमोडे, खंड-९ पू. ३०-३१.