२५६. डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
वागतात त्यांनी एक दिवस निवडणुकी करतां एके ठिकाणी येऊन एकत्र मतदान केल्याने हिंदु-मुसलमानांचं एक राष्ट्र होईल असं म्हणणारे लोक शतमूर्ख आहेत असें माझें म्हणणें आहे. |
वरील विचारांत आक्षेप घेण्यासारखें कांही आहे असे कोणासही केव्हांही वाटण्यासारखे नाही. पण काँग्रेसच्या आमिषाने ज्याची बुद्धि विकृत झाली आहे त्याची विद्वता भोपळ्या ऐवढी मोठी आहे, डोके नीरासक्तीने फिरलेले आहे व शरीर व मन लूद लागलेल्या कुत्र्याप्रमाणे सडलेले आहे ज्यानें विदुषकीकरून स्वार्थ साधन्यापलीकडे व वाचाळ पंचवीशी पलीकडे आजवर आपल्या आयुष्यांत कधी कांही केले नाहीं अशा पुण्याच्या आधींच मर्कट. असणाऱ्यास वरील सुविचार हे THe आहे असें वाटलें तर त्यांत दोष कॉणाचा:? पुणेरी टग्यांच्या सुपलींत सदैव लोटांगण घालून ' मी उभा आहे ' असें बडबडणाऱ्या मर्कटाला दुसऱ्याचे सुविचार हें तर्कट वाटणारच. “१
जनता, २३ मार्च १९४०.