हिन्दी राजकारणाचा विचका हा - Page 299

८८
हिंदी राजकारंणाचा विचका

अर्धवट ब्राह्मण धर्माला विघ्न, अर्धवट राजकारणी देशाला विघ्न

गेल्या जून-जुलै महिन्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दोन महत्वाचे ठराव केले. त्यापैकी पहिला ठराव ता. २२ जून रोजी वर्धा येथे जी काँग्रेस वर्किंग कमिटीचीं सभा भरली होती त्या सभेत पसार करण्यात आला. त्या ठरावाने

अहिंसेला हिंदुस्थानच्या राज्यकारभारात काँग्रेस वकिंग कमिटीच्या मते कोणते स्थान असू शकेल “ या संबंधाने आपली भूमिका स्पष्ट केली गेली आहे. दुसरा ठराव वर्किंग कमिटीच्या दिल्ली येथे ता. ७ जुलै रोजी भरलेल्या बैठकीत पसार करण्यात आला. त्या ठरावाने ” चालू युद्ध व त्या संबंधाने काँग्रेसचे धोरण काय आहे “.हे जाहीर करण्यात आले आहे. हे वरील दोन्ही ठराव नुकतेच पुणे येथे गेल्या आठवड्यात भरलेल्या काँग्रेसच्या ऑल. इंडिया कमिटीच्या समोर ठेवण्यात आले ; व ते दोन्ही ठराव ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने. ब्रहुमताने पसार केल्याचे जाहीर झाले आहे. त्यापैकी पहिला म्हणणे अहिसेबद्दलचा ठराव ९१ विरुद्ध ६३ मतांनी पास झाला व दुसरा म्हणंजें ' युद्धविषयक ' ठराव हाँ ९५ विरुद्ध ४७ मतांनी पास झाला. | | | |

वरील दोन्ही ठराव अत्यंत महत्त्वाचे असे आहेत, हे.कोणासही सांगावयास नको. काँग्रेसच्या आतापर्यंतच्या इतिहासामध्ये इतक्या महत्वाचे दुसरे कोणतेही ठराव झालेले नाहीत, असे म्हटले असंता त्यात काही अतिशयोक्ती होईल असे आम्हास . वाटत नाही. या ठरावांना एवढे महत्त्व असण्याचे कारण उघड आहे. काँग्रेस ही संस्था गांधींच्या ताब्यात गेल्या दिवसापासून म्हणजे १९२० सालाषासून तर १९४० सालापर्यंत 'गांधी' म्हणजे 'काँग्रेस' व 'काँग्रेस' म्हणजे “गांधी” असा उभयतांचा अन्योन्य संबंध होता. गांधींनी बोलावे व कॉँग्रेसने. मान्य करावे, गांधींनी सांगावें व त्याप्रमाणे, काँग्रेसने वागावे, अशी ही. गुरु-शिष्य परंपरा आतापर्यंत चालू होती. दासबाबू व पंडित मोतीलाल यांनी गांधींविरुद्ध स्वतंत्र भूमिका घेऊनं "स्वराज्य पक्ष' निर्माण केला. तेवढा एक प्रसंग बाजूस ठेवला तर गांधी व काँग्रेसमधील लोक म्हणुजे बाप व त्याची आज्ञाकारकं मुले, असा हा संबंध असे. परंतु या दोन ठरावांच्या बाबतीत गांधी आणि काँग्रेस यांच्यामध्ये मतभेद