हिन्दी राजकारणाचा विचका हा - Page 302

२६० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

ही योजना अंमलात येईल असे वाटत नाही. या योजनेबरोबर काँग्रेसने स्वातंत्र्य घोषणेची मागणी केली, ही गोष्ट पूर्ण विचार करून केलेली नाही, असे आम्हास

प्रामाणिकपणे वाटते

या संपूर्ण स्वातंत्र्याच्या मागणीचा इतिहास जितका किसळवाणा आहे तितकाच तो'उद्बोधकही आहे. “संपूर्ण स्वातंत्र्य' हे हिंदुस्थानचे ध्येय आहे. अशाप्रकारची घोषणा पहिल्याप्रथम सन १९२७ साली मद्रास येथे भरलेल्या काँग्रेसच्या ' अधिवेशनात करण्यात आली. या मागणीची पार्श्वभूमी बहुतेकास माहीत नाही, परंतु ती महत्त्वाची असल्याकारणाने तिची माहिती करून देणे आम्हास आवश्यक

वाटते.

पंडित मोतीलाल नेहरू व श्रीनिवास अयंगार या दोन व्यक्ती काँग्रेसमध्ये महान व्यक्ती समजल्या जात असत. त्यांचा दरारा व त्यांचे वजन सर्वव्यापी व सर्वमान्य असे. गांधींनासुद्धा या दोघांचा वचक वाटे. हे दोन काँग्रेसचे आधारस्तंभ अनेक काळपर्यंत बंधुभावाने वागत असत. पण काही काळाने त्यांच्यात चुरस वाढली व चुरशीमुळे वितुष्ट वाढले. एक दुसऱ्याचा हेवा करू ` लागला व दोघेही एकमेकास हाणून पाडण्याकरिता एकमेकांवर डाव करू लागले. या व्यक्तिवादात पंडित मोतीलाल यांना गांधींनी साथ दिल्यामुळे, अर्थात अयंगार यांचे वजन व प्रतिष्ठा थोडीशी कमी होऊ लागली. त्याचा वचपा काढण्याकरिता ज्या अनेक क्लुप्त्या श्रीयुत अयंगार यांनी केल्या त्यापैकीच संपूर्ण स्वातंत्र्यांची कल्पना ही एक होय. गांधी व मोतीलाल या उभयतांना हाणून पाडावयाचे झाल्यास ते मवाळ आहेत व आपण त्यांच्यापेक्षा जहाल आहोत, È दाखविल्याशिवाय आपण यशस्वी होऊ शकणार नाही, असे अयंगार यांस वाटू लागले. तेव्हा बाकीचे लोक नुसते स्वराज्य मागतात, तर आपण त्याच्यापेक्षा एक पाऊल पुढे जाऊन संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली तर अर्थात आपले कार्य ` सिद्धीस जाईल, असे अयंगार यांनी ठरवून त्यांनी मद्रास काँग्रेसच्या वेळी तशा प्रकारची घोषणा करण्यास सुरवात केली. अर्थात गांधी-मोतीलाल यांच्यावर हा मोठाच पेचप्रसंग ओढवला व अयंगारइतकेच आपणही जहाल आहोत, असे दाखवून दिल्याखेरीज त्यातून सहीसलामत बाहेर पडणे शक्य नाही, हे त्यांनी ओळखले. देशदुराभिमानाने संतप्त झालेल्या काँग्रेसमंडळापुढे नेमस्त भाषा वापरून आपली आब्रू वाचेल, असे वाटले नाही आणि म्हणून श्रीनिवास अयंगार यांची भाषणे स्वीकारून अयंगार यांनी रचलेला डाव या उभयतांनी मोठ्या शिताफीने त्यांच्यावरच उलटविला. संपूर्ण स्वातंत्र्याच्या'ठरावाच्या प्रसूति-वेदना ह्या अशा वांझेच्या प्रसूति-वेदनांसारख्या आहेत हे वरील माहितीवरून सर्वांना कळून येईल