हिन्दी राजकारणाचा विचका हा - Page 303

हिंदी राजकारणाचा विचका yo २६१

हा ठराव केवळ पोकळ होता व त्यांच्या मुळाशी स्वातंत्र्याची तिडिक नव्हती. या गोष्टीस आणखी दुसराही पुरावा आहे. सन १९२७ साली हा ठराव पास झाल्यानंतर एकच वर्षाने काँग्रेसच्या विद्यमाने एक सर्वपक्षी कमिटी पंडित मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली प्रस्थापित करण्यात आली होती.

हिंदुस्थानचे स्टेट सेक्रेटरी लॉर्ड THA हेड यांनी सन १९२८ साली हिंदी लोकास उद्देशून असा एक टोमणा मारला होता की राजकीय घटना तयार करण्याची प्राज्ञा हिंदी लोकात नाही व आम्ही इंग्रज लोक जी योजना करणार आहोत ती जर हिंदी लोकांना मान्य नसेल तर त्यांनी आपली अशी एखादी योजना तयार करून दाखवावी. त्या आव्हानाला उत्तर म्हणून एक सर्वपक्षीय कमिटी प्रस्थापित करण्यात आली होती. या कमिटीने आपला रिपोर्ट सन १९२८ साली तयार केला. आश्चर्याची गोष्ट ही की १९२७ साली संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव पास झाला असतांनाही त्या कमिटीने संपूर्ण स्वातंत्र्याची योजना करण्याऐवजी वसाहतीच्या स्वराज्याची योजना मान्य केली ! इतकेच नव्हे तर त्या योजनेला काँग्रेसने सन १९२९ साली लाहोर येथे भरलेल्या अधिवेशनात आपली मान्यताही दिली !!

|

सन १९२७ साली ज्या काँग्रेसने संपूर्ण स्वातंत्र्याचे ध्येय जाहीर केले तीच. काँग्रेस सन १९२९ साली वसाहतीच्या स्वराज्याच्या योजनेला मान्यता देते, या एकाच

गोष्टीवरून संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव करतांना काँग्रेसचा “संपूर्ण” स्वातंत्र्याच्या ठिकाणी कितीसा अढळ विश्वास होता हे साहजिकपणे कोणाच्याही लक्षात येण्यासारखे आहे. सन १९२९ साली जो ठराव पास करण्यात आला, त्यात असे म्हटले आहे की, “ता. ३१ डिसेंबर सन १९२९ च्या आत ब्रिटिश सरकारने जर नेहरू कमिटीची योजना मान्य केली तर काँग्रेस संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी सोडून देऊन वसाहतीच्या स्वराज्यात समाधान मानून राहील.” संपूर्ण स्वातंत्र्याच्या ध्येयाचे बाबतीत काँग्रेसचे वर्तन किती पोरकटपणाचे आहे, ह्याचा हा एक दुसरा पुरावा आहे. स्वातंत्र्यच पाहिजे, त्याशिवाय दुसरे हिंदुस्थानचे ध्येय काँग्रेसला कबूल होऊ शकत नाही,.अशी जर काँग्रेसची मनोदेवता सांगत होती तर अमुक तारखेच्या आत वसाहतीचे स्वराज्य-जे काँग्रेसच्या दृष्टीने कमी प्रतीचे ध्येय-इंग्रज सरकारने मान्य करण्याचे कबूल केले तर 'सूर्वोत्तम' ध्येय सोडून देण्यास जी काँग्रेस सिद्ध होती त्या काँग्रेसचा या संपूर्णैध्येयावर कितीसा विश्वास [होता, ] [ह्याचा ] उलगडा वाचकांना सहज करता येण्यासारखा [आहे. ]

जया संपूर्ण स्वातंत्र्याच्या ध्येयाच्या मांडणीचा इतिहास पाहिला म्हणजे या महत्त्वाच्या बाबतीत काँग्रेसने कसा नादानपणाचा कळस केला आहे, हे उघड