हिन्दी राजकारणाचा विचका हा - Page 305

हिंदी राजकारणाचा विचका २६३

mental out look-if properly led with statesmen at the helm, is bound to make a lasting contribution to the great problem that awaits the statesman, the problem of knitting the world into the greatest federation, the mind can conceive the federation of the human race. But only if properly led with statesmen at the heim-for the development of the idea involves apparent sacrifice on the part of the constituent nations, and it certainly involves the giving up for good of the Empire, idea with its ugly attribute of domination. I think it is for the good of India, for the good of the world that India should strive for freedom within the Commonwealth and so serve the cause of humanity.

वरील उताऱ्यावरून स्पष्ट दिसून येईल की, 'संपूर्ण स्वातंत्र्या' पेक्षा वसाहतीचे स्वराज्य' हेच हिंदुस्थानच्या दृष्टीने श्रेयस्कर आहे, हे श्रीयुत दास यांचे मत कॉंग्रेसने संपूर्ण स्वातत्र्याचे ध्येय मांडण्यापूर्वी दोनच वर्षे अगोदर जाहीर केले होते.

दोन वर्षामध्ये एवढा मोठा फेरबद्दल होण्याला हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये विशेष काही घडले होते, असे कोणास काही म्हणता यावयाचे नाही. तसेच बाबू सी. आर. दास हे इतर काँग्रेसजनापेक्षा मवाळ वृत्तीचे होते, असेही कोणास म्हणता यावयाचे नाही. अर्थात त्यांचे मत निदानभूत मानले तर काँग्रेसने 'संपूर्ण स्वातंत्र्य ध्येयाचे बाबतीमध्ये जी घडामोड केली ती घडामोड एका उच्चप्रतिच्या सुविचारी, समंजस व जहाल अशा काँग्रेस कार्यकर्त्याच्या दृष्टीने अगदी पोरकटपणाची झाली, असे म्हणावयास काही हरकत नाही. नंतर पुढे काही वर्षे संपूर्ण स्वातंत्र्याचे अनेक अर्थ लावण्यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी वेळ घालविली. संपूर्ण स्वातंत्र्य म्हणजे स्वातंत्र्य नव्हे पण ''स्वातंत्र्याचा गाभा" संपूर्ण स्वातंत्र्य म्हणजे “De ब्रिटन आणि हिंदुस्थान यांची भागिदारी" वगैरे प्रकारचे अर्थ लावण्यात आले, शेवटी सन १९३७ साली ही गोष्ट भलत्याच थराला जाऊन पोहोचली. इतकी की गांधींनी त्यांचे सहकारी मित्र मिस्टर पोलॉक यांना लेखी लिहून दिले की, “ब्रिटिश सरकारने हिंदुस्थानला वसाहतीचे स्वराज्य दिले तर आपण त्यात समाधान मानावयास तयार आहोत |”

संपूर्ण स्वातंत्र्याच्या बाबतीत गांधी व काँग्रेस कार्यकर्ते यांनी ज्या विलांट्या कोलांट्या घेतल्या त्यावरून संपूर्ण स्वातंत्र्याच्या ध्येयावर त्यांचा अटळ विश्‍वास आहे, त्याशिवाय दुसरे कोणतेच ध्येय ते मान्य करणार नाहीत, याच्यावर कोणाचाही विश्‍वास बसू शकत नाही. ही केवळ लोकांना उलविण्याची व झूलविण्याची एक शक्कल आहे, असे सर्वांचे मत झाले आहे. याच कारणामुळे इंग्रज सरकारने या मागणीला आतापर्यंत महत्व दिले नाही. म्हणून आमच्या