२६४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
मते काँग्रेसने हे संपूर्ण स्वातंत्र्याचे सोंग सोडून देऊन वसाहतीच्या स्वराज्याची मागणी केली असती तंर त्यात त्यांनी जास्त धैर्य व जास्त शहाणपणा दाखविला, असे म्हणता आले असते
संपूर्ण स्वातंत्र्याचे ध्येय एकदा जाहीर केल्यानंतर ते मागे घेणे हे मनुष्यमात्राच्या स्वभावाला अनुसरून अत्यंत कठीण काम आहे, हे आम्ही मान्य करतो. चुकणे हा मनुष्यधर्म आहे. चुक झाली असे कबुल करणे मनुष्यमात्राला अत्यंत कठीण व जड जाते. त्यात विशेषत: इभ्रतीचा प्रश्न आड येतो. परंतु जेथे चूक झाली हे निर्विवाद आहे व झालेली चूक दूरुस्त केल्याशिवाय ती तशीच पुढे चालू देणे राष्ट्राला विघातक आहे तेथे ती चूक कबूल करणे हे भूषणावह आहे : इतकेच नव्हे तर कर्तव्यप्राप्त आहे.
` घडी भरकी बेशरमी. और जनमभरेका आराम' अशी उर्दू भाषेमध्ये एक अत्यंत व्यावहारिक अशी म्हण आहे. एका मिनिटासाठी थोडीशी शरम बोजूला ठेवली तर पुष्कळ वेळा माणसाला जन्माचे सुख लाभू शकते या दृष्टीने पाहताना वर्किंग कमिटीने या प्रसंगी संपूर्ण स्वराज्याची मागणी न करिता वसाहतीचे स्वराज्य मागीतले असते व या चुकीची दुरुस्ती केली असती तर अधिक शहाणपणाचे झाले असते, असे आम्हास वाटते
दुसऱ्याही एका दृष्टीने:-या प्रश्नाचा विचार करणे काँग्रेसला आवश्यक होते... संपूर्ण स्वातंत्र्य उपभोगीत असलेल्या राष्ट्रांची आज काय दुर्दशा झाली आहे, ही चालू युद्धाची. हकीकत . वाचणाऱ्या: वाचकांना. काही सांगावयास नको. ced सुरू होण्याच्यापूर्वी बेल्जम, हॉलंड, डेन्मार्क, नार्वे, पोलंड, फिनलंड, झेकोस्लोव्हाकिया ही राष्ट्रे संपूर्ण स्वातंत्र्याचा उपभोग घेत होती. नऊ ' महिन्याच्या आत हिटलरने त्यांचे स्वातंत्र्य नष्ट करून त्या सर्व राष्ट्रांना आपल्या अमलाखाली डांबून ठेविले आहे. स्वतंत्र हिंदुस्थान बेल्जम, हॉलंड वगैरे स्वतंत्र देशांच्या परचक्रापासून संरक्षण करण्यास जास्त समर्थ आहे, असे कोणाच्यानेही
आज म्हणवणार नाही व संपूर्ण स्वातंत्र्य मिळाल्यावर हिंदुस्थानची जर तशीच गत
होणार असेल तर.तशा प्रकारचे संपूर्ण स्वातंत्र्य मिळवून काय उपयोग होणार, याचा .दरेकाने विचार करणे अवश्य आहे. या परिस्थितीचा विचार करून जर काँग्रेस वर्किंग कमिटीने: जसे अहिंसेचे तत्व सोडून देण्यामध्ये धैर्य दाखविले त्याचप्रमाणे संपूर्ण स्वातंत्र्याच्या बाबतीत धैर्य दाखविले असते व तूर्त वसाहतीच्या स्वराज्यात आपले समाधान आहे, असे म्हटले असते तर त्यात त्यांना कोणीही दोष दिला नसता. दुसरे असे की ही जी संपूर्ण स्वातंत्र्याची मांगणी केली आहे