हिंदी राजकारणाचा विचका २६५
ती मागणी इंग्रज सरकार पूर्ण करील अशी अपेक्षा करण्याला काही जागा असती
तर तशी मांगणी केल्याबद्दल खेदाला कारण उरले नसते. परंतु आजच्या
परिस्थितीत इंग्रज सरकार तशा प्रकारची घोषणा जाहीर करण्यास सिद्ध होईल,
अशी आशा करण्याला कवडीचाही आधार नाही. इंग्रज लोक हे काही देवदूत
नव्हेत, ते काही वैष्णवजन नव्हेत, ते साधे व्यवहारी व संसारी लोक
आहेत.' संसारी व व्यवहारी माणूस आपल्या हातची गोष्ट सहजासहजी
स्वसंतोषाने जाऊ देणार नाही. यात इंग्रज सरकारला दोष देण्यासारखे काही
नाही. दोन हजार वर्ष अस्पृश्य लोकांना अस्पृश्य ठेवण्यात येऊन अजून देखील
त्यांना देवळाची दारे खुली करण्याचे औदार्य जे हिन्दू लोक दाखवील नाहीत त्या
हिंदू लोकांनी तरी या बाबतीत इंग्रजांची निंदा करण्याच्या भरीस पडू
नये. इंग्रजांना जरब लावण्याची ज्यांच्या अंगात शक्ती असेल त्यांनीच त्यांच्या
कडून स्वातंत्र्याच्या घोषणेची अपेक्षा करावी, हे कोणालाही मान्य करावे
लागेल. ज्या वर्किंग कमिटीच्या लोकांनी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली आहे
त्यांनी इंग्रजांना जरब लावण्याकरिता आपल्या जवळ काय साधने आहेत, याचा
उलगडा करावा म्हणजे तिने केलेली मागणी कितपत सिद्धीस जाईल, याचा अंदाज
करता येईल. आम्हाला तरी काँग्रेसजवळ इंग्रजांना जेरीस आणण्यास काही
साधन आहे, असे दिसत नाही. येऊन जाऊन काँग्रेसचा सर्व भर सत्याग्रहाच्या शस्त्राब्ररती आहे, परंतु ते शस्त्र आज इतके बोथट झाले आहे की त्याच्यापासून इंग्रजांना काही अपाय तर होणे शक्य नाहीच पण ते अमलात आणण्याऱ्याचे मात्र हांसे होईल, हे एक खास आहे. या बाबतीत लोकांची तयारी नाही, हे सत्याग्रहात भागं घेणाऱ्यांची जी यादी मागे प्रसिद्ध झाली होती त्यावरून दिसून येईल. हे जाणूनच की काय होणारा सत्याग्रह लांबणीवर टाकण्यात आला आहे. अजूनही त्याबाबतीत काँग्रेस कार्यकर्त्यांचा निश्चय आहे, असे दिसंत नाही. परवाच-पुणे येथे भरलेल्या “ऑल इंडिया काँग्रेस कमिटी” च्या बैठकीत श्री. राजगोपालचारी यांना काही प्रश्न विचारण्यात आले होते. त्यापैकी "इंग्रज सरकारने जर तुमच्या मागणीप्रमाणे स्वातंत्र्याची घोषणा केली नाही तर त्यांना तसे करण्यात भाग पाडण्याकरिता तुम्ही काही उपाययोजना करणार आहात काय ?” असा प्रश्न विचारण्यात आला. हा प्रश्न अगदी शेलका होता व खरे म्हटले असता याचे समर्पक उत्तर देता येण्यासारखे होते परंतु या प्रश्नाला श्री. राजगोपालचारी यांनी जे उत्तर दिले ते वाचून काँग्रेसकार्यकर्त्यासही विस्मय वाटल्याखेरीज राहिला नसेल. “इंग्रज लोकावरती आजच अविश्वास दाखविण्याचे कारण नाही"