हिंदी राजकारणाचा विचका २६७ .
कमिटीने गेल्या जून महिन्याच्या २१ तारखेस प्रसिद्ध केले. सध्याच्या परिस्थितीत अशा प्रकारचे पत्रक प्रसिद्ध करून अहिंसेसंबंधाने आपले मत काय आहे, हे जगजाहीर करण्याचे काही प्रयोजन नव्हते, असे पुष्कळांना वाटणे साहजिक आहे. परंतु याचवेळी या प्रश्नासंबंधाने काँग्रेस वर्किंग कमिटीला आपले मत जाहीर करण्याला काय कारण झाले हे पुणे येथे भरलेल्या ऑ. इ. कॉ. कमिटीच्या बैठकीत मौ. आझाद यांनी केलेल्या भाषणात उघड केले आहे. मौलाना यांनी सांगितल्याप्रमाणे १९३८ च्या सप्टेंबरमध्ये गांधींनी वर्किंग कमिटीने या प्रश्नावर आपले मत द्यावे असे सुचविले. लवकरच म्युनिकचा तह झाल्यामुळे तो प्रश्न तसाच पडून राहिला. लढाई सुरू झाल्यानंतर गेल्या नोव्हेंबर महिन्यात पुन्हा गांधींनी तो प्रश्न उपस्थित केला, पण मौलाना आझाद यांनी त्यांस थोपवून धरले. पुन्हा गेल्या जून महिन्यात गांधींनी पाठ पुरविली व या प्रश्नाबद्दल निर्णय दिलाच पाहिजे म्हणून आग्रह धरला. यास्तव निर्णय देणे वर्किंग कमिटीला भाग पडले.
सन १९२० साली पहिल्याप्रथम अहिंसेच्या तत्त्वाने हिंदी राजकारणात प्रवेश केला, तेव्हापासून अहिंसेच्या तत्त्वाचा काँग्रेसच्या प्लँटफार्मवरून जिकडे तिकडे
JA Val’ केला जात असे. तथापि गांधी व काँग्रेसवाले यांच्यामध्ये एकमत
नव्हते. आपण अहिंसेला ध्येय म्हणून वागवावे असे म्हणत असताना बाकी लोक केवळ धोरण म्हणून अहिंसेचा उच्चार करतात ही गोष्ट गांधी जाणून होते असे असताना देखील गेल्या २० वर्षात हा प्रश्न धसास लावण्याच्या भरीस ते पडले नाहीत. तो आज धसास लावल्यामुळे एक विचित्र परिस्थिती त्यांनी उत्पन्न
करून ठेवली आहे. युद्धाच्या सुरवातीस एकवटून इंग्रजांशी सामना करण्याला सिद्ध झालेले काँग्रेसचे लोक मुख्य प्रश्न बाजूला ठेवून एकमेकांचे शत्रू जरी नसले तरी विरोधी झाले आहेत, हे उघड दिसत आहे. सुरवातीस गांधी आणि वर्किंग कमिटी एकवटून इंग्रजांशी भांडत असल्याचा जो देखावा दिसत होता त्याऐवजी गांधी आणि वर्किंग कमिटी हे एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्या काढीत असल्याचा देखावा आज दृष्टीस पडतो. एका दृष्टीने हा वाद धसास लावून नसती दुफळी केली याबद्दल: खेद वाटणे साहजिक असले तरी दुसऱ्या दृष्टीने पाहताना झाले हे बरे झाले, असे वाटू लागते. हिंसा-अहिंसा हा प्रश्न गांधींच्या राजकारणात नुसता तात्त्विक विचाराचा प्रश्न आहे, असे कोणालाही म्हणता यावयाचे नाही. तो स्वराज्य प्राप्तीच्या व राष्ट्राच्या संरक्षणाच्या साधनाचा प्रश्न होऊन बसला आहे. अशा दृष्टीने पाहता अहिंसेच्या प्रश्नासंबंधाने लोकांचे खरे मत