आणि भाषणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन २६८
आवश्यक आहे आणि म्हणून गांधींनी काय आहे, याचा अखेर निकाल लावणे अत्यंत
लोकांचे खरे मत काय आहे हे कसास या प्रश्नाला पुन्हा वाचा फोडली व एकदाचे
लावण्याचा प्रसंग ओढून आणला, हे चांगले केले, असे आम्हास वाटते.
गांधींच्या अहिंसेचे स्वरुप कसे आहे, हे जाणून घेणे आवश्यक आहे. जर्मन लोकांनी इंग्लंडवरती स्वारी केली असताना आपला बचाव कोणत्या मार्गाने करावा याबाबतीत इंग्रज लोकांना उद्देशून जे अनावृत्त पत्र गांधींनी जुलै महिन्याच्या ६ तारखेस लिहिले होते त्यावरून गांधींची अहिंसा कोणत्या स्वरुपाची आहे हे चांगले कळून येण्यासारखे आहे. या पत्रात गांधींनी इंग्लिश जनतेस असा सल्ला दिला आहे की "ब्रिटिश जनतेने शस्त्राशिवाय जर्मन राष्ट्राचा प्रतिकार करण्याचा निर्धार करावा. हिटलर किंवा मुसोलिनी' इंग्लिश भूमीवर स्वारी करण्याच्या अगोदरच 'या तुम्हाला काय हवे असेल ते घ्या' असे जाहीर करा तसेच हिटलरला स्वारी करून जे काही घ्यायचे असेल ते त्याला घेऊ द्या व हिटलर व त्याच्या सैनिकांना जर तुमच्या घरादारांचा ताबा घ्यावयाचा असेल तर तुम्ही खुशीने आपली घरेदारे खाली करून त्यांच्या स्वाधीन करा आणि तुम्हाला राहण्याला कोठे स्थळ सापडत नसेल व हिटलर जर तुम्हाला देश सोडून जाऊ देत नसेल तर त्याच्या हातून मरण्यास सिद्ध व्हा. परंतु आत्मरक्षणार्थ कोणत्याही शस्त्रास्त्रांचा उपयोग करू नका.“ ही गांधींची आत्मसंरक्षणाची योजना आपण स्वीकारु शकत नाही, अशाप्रकारच्या सौम्य शब्दात उत्तर दिल्याचे प्रसिद्धही झालेले आहे. ते कसेही
असो, गांधींच्या अहिंसेचे स्वरुप कसे आहे, हे ब्रिटिश जनतेपुढे मांडलेल्या त्यांच्या
या योजनेवरून सर्वांना स्पष्टपणे कळण्यासारखे आहे.
इंग्रजांना अहिंसेचे धडे देऊन गांधी स्वस्थ बसले नाहीत. यापुढे जाऊन या देशानेही परचक्र आले तर या मार्गाशिवाय दुसऱ्या कोणत्याही मार्गाचा अवलंब करू नये ; इतकेच नव्हे तर आज तशाप्रकारचा निश्चय जाहीर करून जगाला
योग्य मार्गाची दिशा दाखविल्याचे श्रेय या देशाने घ्यावे असे गांधींचे म्हणणे आहे. अशा प्रकारच्या अहिंसावृतीच्या निःशस्त्र प्रतिकाराच्या पद्धतीने आपणास
या देशाचे संरक्षण करता येईल. असे शक्य न वाटल्यामुळे वर्किंग कमिटीने गांधींचे म्हणणे अमान्य केले. वर्किंग कमिटीने आपली भूमिका स्पष्ट करताना
अमक्या विरुद्ध प्रसंगी हिंसा आणि तमक्या विरुद्ध अहिंसा असा अमंगल भेदाभेद
केला आहे. इंग्रजांशी तेवढी अहिंसा बाकी सर्वाशी-म्हणजे घरच्याशी व
† पाहा परिशिष्ट : १५.