हिंदी राजकारणाचा विचका २६९
बाहेरच्याशी हिंसा, अशी जी मनोवृत्ती त्यांनी प्रकट केली आहे ती त्यांच्या कुटिल
नीतीस साजण्यासारखीच आहे. परंतु हा भेदाभेद बाजूला ठेवला आणि मुख्य
प्रश्नाकडे दृष्टी दिली तर हिंदुस्थानचा परचक्रापासून कोणत्या रीतीने बचाव करता
येईल या बाबतीत गांधी व वर्किंग कमिटी यांच्यात मोठाच भेद उत्पन्न झालां आहे,
यात शंका नाही.
या हिंसा-अहिंसा वादात गांधींची बाजू घेणारे लोक असा आधार घेतात की गांधी
हे प्रामाणिक आहेत, परंतु येवढ्यावरून गांधींचे मत ग्राह्य होऊ शकत नाही. या
प्रश्नाचा निकाल लावण्याकरता प्रामाणिकपणाला काही महत्त्व आहे, असे
आम्हास वाटत नाही, अहिंसातत्त्व मनुष्यमात्राच्या जीवनाला कितपत उपयुक्त
आहे, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. गांधींच्या प्रामाणिक अप्रामाणिक वृत्तीसंबंधाने .
विचार करण्याचे काही प्रयोजन नाही. त्याचबरोबर प्रामाणिक मनुष्य भोळा
किंवा खुळा असू शकतो; हे कोणी विसरु नये. म्हणून गांधी प्रामाणिक आहेत
किंवा अप्रामाणिक आहेत हा वादाचा प्रश्न नसून गांधींची अहिंसेची म्हणजे नि:शस्त्र
प्रतिकाराची योजना मान्य करण्यासारखी आहे किंवा काय, हा वादाचा प्रश्न
आहे. या प्रश्नाची चर्चा करतांना एकदोन महत्त्वाच्या गोष्टी ध्यानात ठेवणे
अत्यंत आवश्यक आहे. पहिली. गोष्ट ही की, अहिंसा किंवा निःशस्त्र प्रतिकार
हा काही बेफिकीरीचा किंवा टवाळीचा विषय होऊ शकत नाही. युद्धाच्या
बाबतीत दोन प्रकारचे प्रवाह वाहत असलेले' दिसून येतात. काही लोकांची
विचारसरणी बेफिकीरीची असते. त्यांच्या मते सर्व राष्ट्रांचे राजकारण सदोष आहे. सर्वच राष्ट्रे स्वार्थलोलूप आहेत व त्यांच्या दोष-दूषित व स्वार्थलंपट राजकारणातून बाहेर पडणे कोणाही राष्ट्राला शक्य नाही आणि म्हणून युद्ध व शांती अशा प्रश्नांचा विचार करण्याचे कारण नाही. युद्धासारख्या भयंकर आपत्ती ह्या निसर्गाने उत्पन्न केलेल्या आपत्तीप्रमाणेच समजून स्वस्थ बसण्यापलिकडे विचारी माणसाला दुसरे काही करता येण्यासारखे नाही.
दुसऱ्या प्रकारची विचारसरणी अशी आहे की युद्ध हे अनिवार्य आहे. इतकेच
नव्हे तर इष्टही आहे. या लोकांना असे वाटते की राष्ट्र म्हणजे काही तरी महान दैवत आहे व त्या राष्ट्राची इभ्रत, वैभव व त्याचा व्याप वाढण्याकरिता जर युद्ध करण्याचा प्रसंग आला तर तो टाळण्याऐवजी ती एक महापर्वणी समजून राष्ट्राच्या उत्कर्षाकरिता सर्वानी युद्धामध्ये सामील होण्यास सिद्ध व्हावे. मग त्या युद्धात असंख्य कोटी धन नासले, राष्ट्राच्या सर्व दैवी संपत्तीचा नाश झाला तरी हरकत
वाय ६४१ - २०