२७० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
नाही, परंतु “युद्धस्य कथा रम्यः" या दृष्टीने हे सर्व ठीक आहे. युद्धात पाशवी शक्तीचा उपयोग करण्यात आल्यामुळे झालेले युद्धाचे घोर परिणाम ज्यांनी पाहिले आहेत, ऐकिले आहेत किंवा अनुभविले आहेत त्या सर्व लोकांना युद्ध म्हणजे मनुष्यमात्रावरती केवढी भयंकर आपत्ती आहे हे सांगावयास नको. हिटलरसारख्या निर्दय काळपुरुषाची मनोभावना अगर हिंदुस्थानातील आर्य संस्कृतीच्या अभिमानी लोकांची मनोभावना बाजूस ठेविली तर जगामध्ये कोठेही पाशवी शक्ती व युद्ध ही चांगली गोष्ट आहे असे म्हणणारा एकही समंजस मनुष्य सापडणार नाही. तसेच युद्ध म्हणजे विधी घटना आहे; तिच्या उलट जाऊन काय उपयोग, होणार असेल ते होऊ द्या, असे बेफीकीर वृत्तीचे लोकही बरेच सापडतील. उलटपक्षी युद्ध कसे टाळता येईल या खोल विचारात गढून गेलेली माणसे पूर्वी- पेक्षा आज पुष्कळच सापडतील.
अहिंसा किंवा निःशस्त्र प्रतिकाराची योजना काही बेफिकिरीचा किंवा टवाळीचा विषय होऊ शकत नाही किंवा पूजेवर चढलेल्या विंचवाला मारण्याइतकी स्वल्प बाबही नाही. तसेच या योजनेचा पुरस्कार करणारे लोक खुळे किंवा वेडगळ आहेत, असे म्हणता येणार नाही. या विषयावर जी चर्चा चालू आहे त्यावरून पाहता निःशस्त्र प्रतिकाराची योजना एकट्या गांधींची आहे, असा लोकांचा समज | झाला, असे दिसते. परंतु हा समज अगदी चुकीचा आहे.
गांधींचे मताचे अनेक लोक जगाच्या पाठीवर आहेत की जे पाशवी शक्तीच्या विरुद्ध आहेत व ज्यांचा निःशस्त्र प्रतिकाराच्या यशंस्वीतेवर विश्वास आहे. उदाहरणच द्यावयाचे झाले तर सुप्रसिद्ध प्रोफेसर बर्ट्रण्ड रसेल यांचे देता येईल. । |
प्रोफेसर बर्ट्रण्ड रसेल यांच्यासारख्या जगविख्यात विद्वान माणसानेही गेल्या लढाईत ब्रिटिश जनतेपुढे 'अटलांटिक मंथली' नावाच्या अमेरिकन मासिकाच्या १९१५ सालच्या ऑगस्ट महिन्याच्या अंकात लिहिलेल्या एंका लेखात अगदी गांधी सारखीच एक योजना मांडली होती. ती योजना मांडतांना त्यांनी असा युक्तिवाद केला होता की, इंग्रज लोकांनी आपण निःशस्त्र प्रतिकार करणार ~ आहोत, असे जर जाहीर. केले तर इंग्लंडवरती स्वारी करण्यास जर्मन लोकांना मनोधैर्य होणार नाही. सैन्य नाही, आरमार नाही अशा निःशस्त्र इंग्रज प्रजेवर जर्मन लोकांना स्वारी करण्याला काही सबब उरणार नाही आणि यदाकदाचित जर जर्मन लोक आलेच तर सशस्त्र प्रतिकाराची भीती नसल्याकारणाने अगदी. थोडे व अल्प असे सैन्य घेऊन येतील व आल्यानंतर त्यांनी जर राज्य करण्याचा निश्चय केला व इंग्रज लोकांनी त्यांच्याशी जर असहकार. केला तर एकतर जर्मनांना राज्यकारभार करणे अशक्य होईल किंवा लहानसहान जागा भरून