२७२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
हरेक माणसापुढे मुख्य प्रश्न जो उद्भवतो तो म्हणजे मी या युद्धात भाग घेऊ की नको, हा नसून इतरांना मी त्यातून कसा वाचवू शकेन हा प्रश्न असतो. स्वार्थ सोडून परार्थ साधीन, असा मंत्र जपल्याने निर्वैर मनोदशा तयार होईल पण त्यामुळ परार्थ साधेलच हे निश्चित सांगता येणार नाही. लढाईमध्ये लोकजीवनावर आघात होत असतो, ते संकटात सापडले असते व त्याचा नाश होण्याचा संभव असतो. तो नाश 'मी नाश इच्छित नाही' एवढे म्हणून स्वस्थ बसणाऱ्या माणसाच्या हातून टळू शकत नाही. दुसरी गोष्ट अशी की जगामध्ये नुसत्या न्यायाच्या तत्त्वाची स्थापना करून भागत नाही; ते तत्त्व प्रत्र कृतीत उतरुन ज्या-ज्या प्रसंगी त्याच्यावर आघात होईल त्या-त्या प्रसंगी आखाड्यात उतरून त्याचा प्रतिकार केल्याशिवाय कार्यभाग होणार नाही. नुसती न्यारी वृत्ती ठेवल्यास स्वत:पलिकडे दुसऱ्या कोणालाही त्याचा उपयोग होत नाही आणि प्रत्यक्ष कृती करू लागले असताना कोणतीही कृती तिच्या पाठी शक्ती असल्याखेरीज सिद्धीस जाऊ शकणार नाही.
यावरून दिसून येईल की नुसती निर्वैर मनोदशा अंगी बाणल्याने काही उपयोग होऊ शकत नाही. मनोवृत्तीप्रमाणेच हातून कृती झाली पाहिजे आणि कृती जर व्हावयाची तर शक्तीचा उपयोग केल्याखेरीज गत्यंतर नाही.
निःशस्त्र प्रतिकाराचे पुरस्कर्ते 'आम्ही मुळीच शक्तीचा उपयोग करीत नाही' असे जे सांगतात तो त्यांचा केवळ भ्रम आहे. परंतु आमची शक्ती नैतिक आहे-पाशवी नाही. हा त्याचा जो मुद्दा आहे तो मात्र खरा आहे. पण त्यावर पहिला प्रश्न असा की पाशवी शक्ती ही नैतिक शक्तिपेक्षा कितीशी भिन्न आहे व नेतिक शक्ती पाशवी शक्तीपेक्षा कमी क्रूर स्वरूपाची आहे, असे नेहमीच म्हणता येईल काय ?
पाशवी शक्तीने भयंकर नाश होऊ शकतो हे उघड दिसते. म्हणून पुष्कळ लोकांना पाशवी शक्तीचा तिरस्कार वाटतो. परंतु नैतिक शक्तीदेखील तितकाच नाश करू शकते-तितकेच क्रूर स्वरुप धारण करू शकते- हे पुष्कळांना दिसू शकत नाही. परंतु हे आमचे म्हणणे खरे आहे. हे एक-दोन उदाहरणांनी पटवून देता येण्यासारखे आहे. समजा, एका स्त्रीला मूल झाले परंतु हे तिच्या इच्छेप्रमाणे जितके सुस्वरुप असावयास पाहिजे होते तितके ते नव्हते. मुलाचा वीट येऊन आईने त्याच्याशी असहकार | केला. त्याच्या मानेला नख देऊन त्याचा प्राण घेण्याचे पाशवी कृत्य न करता त्याला स्तनपान करण्याचे सोडून दिले. स्तनपान सोडून देणे हे सकृतदर्शनी गळ्याला नख देण्याइतके पाशवी कृत्य दिसत नाही. परंतु