हिन्दी राजकारणाचा विचका हा - Page 315

हिंदी राजकारणाचा विचका २७३

परिणामाच्या दृष्टीने जर पाहिले तर 'नख देणे' व “स्तनपान न करणे' या दोहोत

काय फरक आहे, हे सांगणे कठीण आहे. आणखी एक उदाहरण घेऊ. समजा

एका गावामध्ये एक मनुष्य असा निघाला की तो गावापासून भिन्नरितीने व भिन्न विचाराने आपले जीवन घालवू लागला. गावातल्या लोकांनी त्याचा खून केला नाही. परंतु त्याचे पाणी बंद केले, त्याचा बाजार बंद केला व त्याच्यावर सर्व तऱ्हेने बहिष्कार पुकारून त्याचे जिवित अशक्य केले, बहिष्कारात खून होत नाही म्हणून बहिष्कार पाशवी शक्‍ती नव्हे, असे कदाचित म्हणता येईल. परंतु प्रत्यक्ष खून करण्यामध्ये व बहिष्कार घालण्यामध्ये काय मोठे अंतर आहे, असा जर प्रश्‍न केला तर त्याचे कोणी होकारार्थी उत्तर देऊ शकेल, असे दिसत नाही.

दुसरा प्रश्‍न, नैतिक शक्ती पुरी पडली नाही-तिच्याने युद्धाचे संकट टळले नाही- तरीसुद्धा पाशवी शक्तीचा उपयोग करू नये काय? निःशस्त्र-प्रतिकारवादी लोक स्वारी करणाऱ्या शत्रूच्या अंगच्या नैतिक बलावरती आपल्या कार्यसिद्धीकरिता अवलंबून असतात. आपण नैतिक बल दाखविले तर शत्रूला लाज वाटल्याशिवाय राहणार नाही ; त्याचे मन द्रवेल, तो माघार घेईल व हा घोर प्रसंग टळेल, अशी त्यांची अपेक्षा असते. प्रो. बर्ट्रण्ड रसेल यांची योजना याच कोटीक्रसावर रचलेली होती. परंतु वरील प्रश्‍नाला हे काही उत्तर नव्हे. समजा की एखाद्याने सर्वप्रकारची लाजलज्जा सोडून सर्व नीतीची बंधने झुगारून दिली आणि निःशस्त्र प्रजेवर पाशवी शक्तीचा उपयोग करण्यास तो सिद्ध झाला तर निःशस्त्र प्रतिकाराच्या योजनेतून उत्पन्न होणारे नैतिक बल कितीसे टिकू शकेल आणि ते टिकणे शक्य नाही, असे दिसत असतानासुद्धा पाशवी शक्तीचा उपयोग अतिक्रमणाकरिता नव्हे पण निदान संरक्षणाकरितादेखील करू नये की काय? व तसे न करणे हे जर त्यांचे तत्त्व असेल तर पाशवी शक्तीच्या आघाताने मरणे आणि आत्महत्त्या करणे यात काय फरक आहे ? आता कोणी असेही म्हणतात की निःशस्त्र प्रतिकाराच्या योजनेची यशस्वीता शत्रूच्याठायी जागृत होणाऱ्या नैतिक : बलावरच अवलंबून आहे, असे नव्हे तर निःशस्त्र-प्रतिकारवाद्यांचे आत्मबल व शत्रूंशी असहकार या दोहोवरती अवलंबून आहे. आणि म्हणूनच तिच्या यशस्वीतेसंबंधाने त्यांना खात्री वाटते. निदान प्रोफेसर रसेल यांच्या योजनेच्या मुळाशी हा युक्तिवाद होता.

निःशस्त्र प्रजेचा असहकार प्रतिकाराच्या दृष्टीने कोठवर जाऊ शकतो याचा अनुभव हिंदुस्थानातील लोकांना सांगण्याचे काही कारण नाही. असहकाराची भाषा फार सोपी आहे. परंतु कृती फार कठीण आहे व कृती झालीच तर तिचा प्रतिपक्षावर कवडीचाही परिणाम होऊ शकत नाही, हे वीस वर्षांच्या अनुभवाने या