हिंदी राजकारणाचा विचका २७५
प्रसंगी पाशवी शक्तीचा कोणीही उपयोग करू ae,’ असे म्हणणे म्हणजे मोठाच दुराग्रह आहे. अमेरिकेतील निग्रो लोक अनेक वर्षेपावेतो गुलामगिरीत खितपत पडले होते. त्यांच्या सुटकेकरिता अमेरिकेत मोठे युद्ध घडले अर्थात पाशवी शक्तीचा पूर्ण उपयोग करण्यात आला. नुसत्या नैतिक बलावर जर त्यांची सुटका अवलंबून ठेवण्यात आली असती तर निग्रो लोक औतापर्यंत तरी गुल'मगिरीतून मुक्त झाले असते किंवा नाही याबद्दल आम्हास संशय वाटलो. तसेच त्यांना स्वातंत्र्य संपादन करून देण्याकरिता ज्या पाशवी शक्तीचा उपयोग करण्यात आला, त्यात अमेरिकन राष्ट्राची नैतिक चूक झाली, असे म्हणणारा नैतिक वृत्तीचा कोणी माणूस क्वचितच सापडेल, असा आम्हास विश्वास वाटतो. आज जगामध्ये अनेक राष्ट्रे गुलामगिरीत आहेत. त्या सर्व राष्ट्रांची
मुक्तता व्हावयाची आहे. नेतिक बलाने त्यांची मुक्तता होणे शक्य असेल, तर पाशवी शक्तीचा विनाकारण उपयोग करा, असे म्हणणाऱ्या माणसाला वेड्यात काढण्यास कोणीही हरकत घेणार नाही. परंतु नैतिक बलाने हे कार्य जर होणार नसेल तर या कार्याला पाशवी शक्तीचा उपयोग करू नये, असे म्हणणाऱ्या माणसालाही मुर्खात काढल्याशिवाय गत्यंतर नाही. शक्ती हे साधन आहे, स्वातंत्र्य हे ध्येय आहे. ध्येय जर निष्कलंक व शुद्ध असेल तर त्या ध्येयाची सिद्धी करण्याकरिता आत्यंतिक साधनाचा उपयोग करण्या नीतीचे तत्त्व आड येऊ शकत नाही व जर आले तर ते नीतीचे तत्त्व खोटे आहे, असे म्हणावयास काही हरकत नाही. अहिंसा हे साधन आहे, ध्येय नव्हे आणि ध्येयानुसार साधनांची युक्तायुक्तता ठरवावयाची असते, हा पहिला सिद्धांत होय. या अहिंसेच्या वादामध्ये सदोष व आत्यंतिक विचाराची मांडणी करण्यात येत असेल तर त्याचे मुख्य कारण म्हण्जे वाद करणाऱ्या लोकांनी “साधन कोणते” व “ध्येय कोणते'' हे नीटपणे ध्यानात न ठेविल्यामुळे असा प्रकार होतो. अहिंसा हे काही झाले तरी ध्येय होऊ शकत नाही. अहिंसा एक साधन आहे. ध्येय सपादनाकरिता ते जर पुरे पडत असेल तर पाशवी शक्तीचा कोणीही उपयोग करू नये, असे म्हणता येईल. परंतु ध्येयाच्या संपादनाकरिता जर अहिसेचे साधन अपुरे पडत आहे, आणि ध्येयाचा नाश होत आहे, तरीसुद्धा अहिंसेशिवाय दुसऱ्या कोणत्याच साधनाचा उपयोग करता कामा नये, असा आग्रह धरणाऱ्या माणसाला
मूर्खातच काढावे लागेल.
दुसरा सिद्धांत असा आहे; पाशवी शक्तीचा उपयोग दुसऱ्यावर अन्याय लादण्याकरता करणे हे पाप आहे; परंतु पाशवी शक्तीचे निवारण करण्याकरिता तिचा उपयोग करणे यांच्यात काही पाप नाही, नव्हे, तसे करणे नीतीस धरून होईल. या प्रश्नासंदंधाने अहिंसावाद्यांच्या विचारात बराचसा घोटाळा झालेला