हिन्दी राजकारणाचा विचका हा - Page 318

२७६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

दिसतो. एका बाजुने ते सांगतात की, पाशवी, शक्तीच्या बळाने कोणत्याही गोष्टीचा निर्णय करण्यात येऊ नये, दुसऱ्या बाजूने सांगतात की जर तुमच्यावर कोणी पाशवी शक्तीचा उपयोग केला तर त्याचा प्रतिकार करू नका. पण या गोष्टी कशा परस्पर विरोधी आहेत, हे त्यांना दिसत नाही. पाशवी शक्तीचा प्रतिकार न करणे म्हणजे पाशवी शक्तीला निर्णय करून घेण्याला मोकळीक करून देण्यासारखेच नव्हे, मदत करण्यासारखे आहे. खरी विचाराची दिशा अशी आहे : तुमच्यावर पाशवी शुक्तीचा जर कोणी उपयोग केला तर त्याचा आवश्यक असेल तर पाशवी शक्तीने प्रतिकार करा. परंतु पाशवी शक्तीने प्रतिपक्षाला पराजित केल्यानंतर वादाचा निकाल आपल्या THA लावून पराजितावर अन्याय करण्याला पाशवी शक्तीने मिळविलेल्या जेतेपणाचा उपयोग करू नका,

पाशवी शक्तीचा उपयोग करून दुसऱ्यावरती आपली सत्ता लादणे हा प्रश्‍न निराळा आहे. हे दहन प्रश्‍न अगदी भिन्न आहेत व ते भित्र आहेत याची जाणीव नसल्यामुळे सर्वत्र विचारांचा घोटाळा दिसून येतो. पाशवी शक्तीचा उपयोग पाशवी शक्तीच्या विरुद्ध करणे हे आमच्या मते आवश्यक आहे, इतकेच नव्हे तर न्याय्यही आहे कारण पाशवी शक्तीचा नाश जर पाशवी शक्तीनेच होणार असेल तर व तो नाश करणे जर इष्ट असेल तर पाशवी शक्‍तीचा उपयोग करणे काही वावगे नाही. जगात जो अन्याय उत्पन्न होतो तो पाशवी शक्तीविरुद्ध पाशवी शक्तीचा उपयोग केल्याने होत नसून पराजितावरती जेत्यांनी लादलेल्या दुर्घट अटींमुळे होतो ही गोष्ट बरेच लोक विसरतात. शांतताप्रिय लोकांनी पाशवी शक्तीच्या विरुद्ध बंड न पुकारता युद्ध संपल्यानंतर पाशवी शक्तीमुळे विजय संपादून केलेल्या राष्ट्रांनी पराजित राष्ट्रावरती अन्याय केल्यास जर प्रतिकार करण्यास सिद्धता दर्शविली तर जगातील अन्याय नाहीसा होईल. अन्याय नाहीसा झाला तर युद्ध नाहीसे होईल व युद्ध नाहीसे झाले तर पाशवी शक्तीची उपासना करण्याचे काही कारण उरणार नाही. अहिंसा प्रस्थापित करण्याच्या बाबतीत हा महत्त्वाचा सिद्धांत आहे असे आम्हास वाटते.

तिसरा सिद्धांत असा की निःशस्त्र प्रतिकाराचा मार्ग एका राष्ट्राने पत्करला व बाकीच्यांनी पत्करला नाही तर त्याचा काही उपयोग होणे शक्य नाही. एका राष्ट्राने निःशस्त्र प्रतिकाराचा स्वीकार केल्याने बाकीची राष्ट्रे त्याचे. अनुकरण करतीलच, असे समजून चालावयास काही आधार नाही. नवा मार्ग सुलभ असला तर त्याचे लोक अनुकरण करतात पण दुर्गम असेल तर करीत नाहीत. दुसरे असे की काही गोष्टी एकानेच करून भागत नाही. सर्वानीच त्या करावयाच्या असतात ; नाहीतर त्या होत नाहीत. उदाहरणार्थ सोशॅलिझम