हिन्दी राजकारणाचा विचका हा - Page 319

हिंदी क

हिंदी राजकारणाचा विचका २७७

एकट्याने करून सर्वत्र सोरशॅलीझमची पद्धत पडू शकत नाही. सर्वानीच केला तर सोशॅलिझम अमलात येऊ शकेल. . तोच न्याय निःशस्त्रsप्रतिकाराच्या तत्त्वाला लागू पडतो. पद्धत पाडणे आणि धडा घालून देणे, या दोहोत फार अंतर आहे. कधी कधी धडा घालून देणाराची मात्र आहुती पडते पण मुख्य हेतू जो पद्धत पाडण्याचा तो सिद्धीस जात नाही. निःशस्त्र प्रतिकारासारखी जोखमीची योजना अंमलात आणण्याची जबाबदारी एकाच राष्ट्राने आपल्या अंगावर घेणे यात औदार्य असेल पण शहाणपणा आहे, असे म्हणता येणार नाही. निःशस्त्र प्रतिकार ही गोष्ट सर्वानीच एकसमयावच्छेदेकरून करावयाची आहे, तसे व्हावयास जागतिक संघटना झाली पाहिजे व सर्व राष्ट्रांना हे तत्त्व मान्य झाले पाहिजे. हे एकट्या दुकट्या राष्ट्राचे काम नव्हे.

अहिंसेचे तत्त्व हिंदुस्थानमध्ये आदिकालापासून चालत आलेले आहे. अहिंसा धर्मांचा उपज येथेच झाला आहे. आर्य लोक हे ध्येयाने व कृतीने हिंसावादी होत. यज्ञ हा त्यांच्या धर्माचा मुख्य पाया. त्या यज्ञात हिंसा व मद्यपान याशिवाय दुसरे काहीच नसे. या हिंसेचा इतका अतिरेक झाला होता की, त्याकाळच्या काही आर्य लोकांना त्यांच्या हिंसेचा वीट आला होता. या हिंसक आर्य धर्माला कंटाळून महावीर याने अहिंसा-वादी जैन धर्म प्रस्थापित केला. पण या दोहोत तत्वाचा अतिरेक झाला. आर्यांची आत्यंतिक हिंसा वृत्ति तर जैनांची आत्यंतिक अहिंसा! या दोन्ही अव्यवहार्य वृत्ती! म्हणून गौतम बुद्धाने आपला बौद्ध धर्म प्रस्थापित केला. यात दोहोतील अतिरेक सोडून त्यातील सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न केला. शक्य तोवर अहिंसा, जरूर तर हिंसा' ही गौतम बुद्धाची भूमिका होती. हा बौद्ध धर्म जर टिकून राहिला असता तर अहिंसेबद्दलचे आजचे हे प्रश्‍न उपस्थित झालेच नसते. पण आमच्या ब्राह्मण बंधूंना हिंसेविरूद्ध उठलेली जनता वश करून बुद्धाचा पाडाव करण्याची लालसा उत्पन्न झाल्यामुळे त्यांनी अहिंसेला धरले आणि त्याचा पुरावा म्हणून गोमांस खाण्याचे सोडून शाकाहार करू लागले. अशा रीतीने बुद्धाच्या विचारसरणीचा लोप होऊन आत्यंतिक अहिंसेचा पगडा हिंदू लोकांवर बसविण्यात आला. हा पगडा आज हजारो वर्षांपासून बसला असल्या कारणाने लोक भेकड दुबळे झाले आहेत. त्यांचा आत्मविश्वास नाहीसा झाला आहे. या आत्यंतिक अहिंसेच्या तत्त्वानेच वागा म्हणून सांगेल तो त्याचा मित्र नसून शत्रू आहे. असे म्हणावे लागेल.

मानवी जीवनाला कोणत्यातरी नैतिक तत्त्वाचा पाया असावा हे आम्हास मान्य आहे. संसारी जीवनालाच नव्हे तर राजकारणालाही तो असावा हे आम्हास कबूल आहे. मागे १९२० साली गांधी आणि टिळक ह्या उभयतात या