हिन्दी राजकारणाचा विचका हा - Page 320

२७८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

प्रश्‍नासंबंधाने वाद झाला होता. त्यात राजकारणात 'शठटरेतिशाठयंम्‌' याच तत्त्वाच्या आधारे आपण वागले पाहिजे असे टिळकांनी प्रतिपादिले होते. अगदीच नागडे तत्त्व मांडल्याची लाज वाटून की काय टिळकांनी त्यावर पदर घालण्याचा प्रयत्न केला. 'शठं प्रतिशाठयंम्‌' तत्त्वाने आपल्या मताचा विपर्यास केलः जातो व आपली खरी भूमिका दर्शविण्याकरिता आपण "'अक्कोधेन जिने क्रोधं असाधुं साधुन! जिने ! जिने कदरिये दानेन सच्चेन लोकवादिना” (दुसऱ्याचा क्रोध आपल्य शांतीने जिकावा, दुष्टास साधुपणाने जिंकावे, आणि असत्य सत्याने जिकावे) हे Ten बुद्धांचे तत्त्व मान्य नाही, पण गीतेत सांगितलेल्या 'ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम्‌' (जे मला ज्या प्रकारे भजतात त्यांना मी त्याप्रमाणेच फल देतो) यः तत्दाप्रमाणे राजकारणात वागावे व ती आपली भूमिका आहे, असा त्यांनी नंतर खुलासा केला. या वादात गांधींनी गीतेतल्या तत्त्वापेक्षा बुद्धाचेच तत्त्व श्रेष्ठ आहे व राजकारणात गीतेच्या तत्त्वापेक्षा बुद्धाचे तत्त्व लाभदायक होईल असे सांगितले. आम्ही या बाबतीत गांधींशी सहमत आहोत. गीतेतील तत्व आणि नाना फडणदिसाचे शठमूप्रतिशाठ्यम्‌ यांच्यात आम्हाला काही फरक दिसत नाही. परंतु बुद्धाची बाजू जरी गांधीनी घेतली असली तरी अहिंसेच्या बाबतीत बुद्ध आणि गाँधी याच्यात मोठा फरक आहे हे ध्यानात ठेवणे आवश्यक आहे. तो फरक म्हणजे तत्त्व आणि नियम यातला फरक आहे. बुद्ध अहिंसेला तत्त्व म्हणून मानीत असे, नियम म्हणून मानीत नसे. गांधी अहिंसा हा नियम आहे. असा प्रचार करीत आहेत. तत्त्व आणि नियम यांच्यात फरक आहे व तो फरक मोठा आहे. ( Principle is to be followed ) नियम पाळावयाचा असतो. (Ruleis to be obeyed ) नियम झाला की मनुष्य त्याचा गुलाम होतो. तत्त्व ठरले की मनुष्य त्याचा उपासक होतो; गुलाम होत नाही. हा फरक ध्यानात न आल्याकारणाने अनेक समाज रसातळास गेले आहेत. तत्त्व लवचीक असते, नियम कडक असतो. त्याला मोडता येत नाही, नियम मात्र समाजाची मोडतोड करू शकतो. नियम अडाण्याकरितः असतो. तत्त्व शहाण्याकरता असते. तत्त्व प्रगतीला बाधा आणू शकत नाही. नियम गती खुंटवितो. हा महत्त्वाचा फरक गांधींना समजलेला नाही असे दिसते.

अहिंसेसारख्या गंभीर विषयासंबंधाने गांधींच्या विचारात काही फेरबदल झांला आहे की काय हे जाणून घेण्याची जिज्ञासा होणे सहाजिकच आहे. गांधींचे जुने विचार कसे होते हे त्यांच्या लेखातून घेलतेल्या उताऱ्यावरून सहज ध्यानात येण्याजोगे आहे.