MR/Khand_20 - Page 32

समाजामध्ये आमूलाग्र परिवर्तन करताना विरोधकांचा थरकाप उडविणारी व प्रतिपक्षाच्या उरात धडकी भरविणारी निर्भय आक्रमकता आवश्यकच असते. प्रस्थापित उच्चभ्रूंवर आक्रमक पावित्र्यात झेपावणान्या बाबासाहेबांचे संघर्षशील लेखन हे प्रतिपक्षाची भंबेरी उडविते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतातील प्रज्ञावंत निबंधकार आहेत. ते इहवादी विचारसरणीचे बुद्धिनिष्ठ विचारवंत आहेत. बुद्धिप्रामाण्यवाद व विवेकवादाचा प्रखर प्रकाश त्यांच्या निबंधात सर्वत्र दिसून येतो. बाबासाहेबांच्या विज्ञाननिष्ठ व लोकशाहीवादी दृष्टिकोनामुळे त्यांचा निबंध मराठी विचारपरंपरेतील वैशिष्ट्यपूर्ण व अनन्यसाधारण स्वरूपाचा निबंध ठरतो. हा निबंध आमूलाग्र क्रांतीच्या ध्येयाने प्रेरित झालेला असल्यामुळे त्यातील आशयतत्त्व तेजःपुंज रूप धारण करते. बाबासाहेबांच्या या निबंधातील आशयाकडे पाहिले की, गॅरीसनच्या विचारांची

- आठवण होते. त्याने म्हटले आहे, “ मी सत्याइतकाच निष्ठ्र आणि न्याय देवतेप्रमाणे निःस्पृह राहीन, मी निग्रही आहे आणि नेह्मी खंबीर राहीन." बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या पत्रकारितेत गॅरीसनच्या उक्तीप्रमाणेच सत्य जपले. त्यांची पत्रकारिता सुरुवातीपासून शेवटपर्यंत निःस्पृह, न्यायनिष्ठूर व कर्तव्यकठोर राहिली आहे. या न्यायनिष्ठूरतेमुळे व कर्तव्यकठोरतेमुळे बाबासाहेबांचा वैचारिक निबंध तिमिरकुलावर हल्ला चढवितो व तेथे प्रकाशापर्व निर्माण करतो. सतत संघर्षरत राहणारा हा निबंध तळृगाळातील दलित शोषित समूहाला दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करतो. दलित वर्गाला संघर्षप्रवण करण्याकरिता व अन्यायाविरुद्ध झुंज देण्याकरिता बाबासाहेब महाभारतातील वीरपत्नी विदुलेच्या उपदेशाचे उदाहरण देतात. दलितांची मृतावस्थेस गेलेली अस्मिता जागी करण्यासाठी ते जीवाचे रान करतात आणि या जळणाऱ्या जीवाची काहिलीही शब्दाशब्दांतून ओततात. गुलामांना गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे ते पेटून उठतील, हे विचारसूत्र डोळ्यांपुढे ठेवून ते नवमूल्यांचे सर्जन करतात. ही नवमूल्यांची सर्जनशीलता मराठी वैचारिकतेमध्ये अपूर्व मानावी लागते.

बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्रकारितेचे मूल्य ऐतिहासिक स्वरूपाचे आहे. त्यांची पत्रकारिता दलित-शोषित समाजाच्या अभ्युदयाची नांदी ठरली. शेकडो वर्षांच्या अमानुष शोषणाने दलितांच्या जीवनाची राखरांगोळी झाली होती. त्यांच्यातील आत्मतेज केव्हाच लयास गेले होते. त्यांच्या पूर्वजांनी दाखविलेल्या क्षात्रतेजाची त्यांना विस्मृतीही झाली होती. अशा मूक व बहिष्कृत लोकांच्या जीवनात कोणत्याही प्रकारची अर्थपूर्णता नव्हती 'की जिवंतपणा नव्हता. या अस्पृश्यांचे जीवन हिंदू समाजातील श्रेणीबद्ध विषमतेचे बळी ठरले होते. शेकडो वर्षांचे हे अंधकारमय

(aaria)